मुंबई -राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी सरकारने कंबर कसली ( MH gov measures for control corona ) आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून पुणे व नागपूर जिल्ह्यांना सुमारे ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित केल्याची माहिती सरकारने दिली आहे.
मागणीनुसार निधी वाटप
कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली ( coronas third wave in Maharashtra ) आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. कोरोनाचा बिमोडसाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना आखल्या ( Measures for corona prevention ) आहेत. सध्या पुणे, नागपूर मध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. पुण्यात ठोस उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरीत केले आहेत. या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाख ( Fund for Pune to control corona ) , सोलापूर जिल्ह्याला १० कोटी ( Fund for Pune to control Solapur ) , सातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी वितरित केल्याची माहिती, राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही वाचा-Bulli Bai App Case : बुलीबाई अॅप प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी