महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अखेर राज्यातील शाळांना दीड महिन्याची सुट्टी, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा - शाळांना दीड महिन्याची सुट्टी

आज शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ( circular of school education department ) , 2 मे 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. हा सुट्टीचा कालावधी 12 जून 2022 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये दुसरा सोमवार 13 जून 2022 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात ( temperature in Vidarbha ) घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथ्या सोमवारी 27 जून 2022 रोजी सुरू होतील.

शाळांना सुट्टी
शाळांना सुट्टी

By

Published : Apr 11, 2022, 10:11 PM IST

मुंबई- रणरणत्या उन्हाळ्यात मुलांसाठी दिलासादायक बातमी आहे. संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2022-23 सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने अखेर आज परिपत्रक ( MH GR on school holidays ) प्रसिद्ध केले आहे. परिपत्रकानुसार, राज्यातील शाळांना दीड महिन्याची सुट्टी मिळणार आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या उन्हाळी सुट्टीचा गोंधळ ( Summer holidays for school students ) मिटला आहे.


शाळांना दीड महिन्याची सुट्टी-आज शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ( circular of school education department ) , 2 मे 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. हा सुट्टीचा कालावधी 12 जून 2022 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये दुसरा सोमवार 13 जून 2022 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात ( temperature in Vidarbha ) घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथ्या सोमवारी 27 जून 2022 रोजी सुरू होतील. याशिवाय इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल 30 एप्रिल 2022 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावण्यात येईल.

शाळांना सूचना-शाळेतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव व नाताळ यासारख्या सणाचे प्रसंगी ती समायोजनाणे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने घ्यावीत. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार, शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या एकूण 76 दिवसा पेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यात यावीत. आगामी शैक्षणिक वर्षापासून या पुढे दर वर्षी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यात दुसऱ्या सोमवारी सुरू करण्यात येणार आहेत. तर विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी तारखेपासून शाळा सुरू करवातीत, अशा सूचना परिपत्रकाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा- शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षक पालक व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आपल्या गावी न गेलेल्या सर्वांना सुट्टीचा आनंद घेता येईल, असे मत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-Food poisoning : भिवंडीतील आश्रम शाळेतील 17 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

हेही वाचा-VIDEO : पुण्यातील शाळेत पुन्हा बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की
हेही वाचा-विद्यार्थ्यांची 40 कि.मी पायपीट, शैक्षणिक सुविधेच्या अभावामुळं आदिवासी विकास भवनाबाहेर केले आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details