मुंबई - लोकसभेत पंतप्रधानांनी भाषण करताना महाराष्ट्रातून आलेल्या मजुरांमुळेच देशभरात कोरोना पसरला असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागत नाही, तोपर्यंत राज्यभरात कॉंग्रेसकडून असेच आंदोलन सुरू राहणार असल्याचे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ( congress protest PM statement ) म्हटले आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले ( Atul Londhe slammed BJP over PM ), की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कितीही काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळले. तरी, हे आंदोलन थांबणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रासहित छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना भाजपाचे खासदार लोकसभेत बाक वाजवित होते. त्यामुळे महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना आणि मंत्र्यांना कधीही माफ करणार नाही. त्यामुळे जोपर्यंत पंतप्रधान महाराष्ट्राची माफी मागत नाही, तोपर्यंत, काँग्रेसकडून असेच आंदोलन सुरू राहणार आहे.
हेही वाचा-चोरट्यांनी आधी देवीचे दर्शन घेतले, नंतर दानपेटीवर मारला डल्ला.. पाहा व्हिडिओ
काँग्रेसचे मुलुंडमध्ये आंदोलन