मुंबई-काँग्रेस खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घातली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.
काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराचे अर्ज भरले आहेत. त्यावेळी काँग्रेसकडून रजनी पाटील तर भारतीय जनता पक्षाकडून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
हेही वाचा-राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी बदलावी लागणार, रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी
राजकीय परंपरेनुसार निवडणूक बिनविरोध व्हावी-
राज्यातील आमदार किंवा खासदारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, त्या जागी निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. त्या परंपरेनुसार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षाला विनंती करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी विनंती केली आहे.
हेही वाचा-सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी लवकरच निवडणूक