मुंबई -मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प ( Metro project in Mumbai ) राबवला जात आहे. गिरगाव येथे मेट्रोचे काम सुरु ( Metro project affected ) आहे. मात्र येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. यासाठी मंगळावरी मोर्चा ( March on Mangalavari Metro Project ) काढला जाणार असून मेट्रोचे काम बंद केले जाणार आहे. याबाबतचा प्रश्न "ई टीव्ही भारत"च्या पत्रकाराने विचारताच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मेट्रो ३ च्या प्रमुख अश्विनी भिडे ( Ashwini Bhide ) यांना राग अनावर झाला. मेट्रोचे प्रश्न पालिकेत विचारू नका असे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेत गुंडाळून निघून गेल्या.
Metro Project : मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर अश्विनी भिडे यांना राग अनावर; पत्रकार परिषदेतून काढता पाय - Ashwini Bhide
मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प ( Metro project in Mumbai ) राबवला जात आहे. गिरगाव येथे मेट्रोचे काम सुरु ( Metro project affected ) आहे. मात्र येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. यासाठी मंगळावरी मोर्चा ( March on Mangalavari Metro Project ) काढला जाणार असून मेट्रोचे काम बंद केले जाणार आहे.
मेट्रो विरोधात उद्या मोर्चा -मुंबईमधील गिरगाव येथील सूर्यमहल, चंद्रमहल,तारामहल या तीन इमारती मेट्रो ३ प्रकल्पात बाधित होत आहेत. या इमारती ताब्यात घेताना मेट्रोने ४३६ रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. या इमारती मेट्रोकडे हस्तांतरित झाल्या आहेत. प्रॉपर्टी कार्डवर मेट्रोचे नाव नोंद झाले आहे. त्यानंतर या इमारतीमधील ६ व्यवसायिक गाळेधारकांना, १३ रहिवाशांना मेट्रोने अपात्र घोषित केले आहे. भाडे पावती नाही, घर नावावर नाही, कागदपत्रे १९९५ पूर्वीची नाहीत अशी करणे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही लोकांनी १९९५ नंतर घरे खरेदी केली आहेत. असे असताना त्यांना १९९५ पूर्वीची कागदपत्रे मागितली जात आहेत. काही लोकांना वारसाहक्कासाठी कोर्टाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये संताप आहे. यासाठी उद्या मंगळवारी सकाळी काळबादेवी गिरगाव रहिवाशी कृती समिती यांच्या वतीने अन्यायाच्या विरोधात प्रिन्सेस स्ट्रीट सिग्नल ते गिरगाव असा आक्रोश मोर्चा काढून मेट्रोचे काम बंद केले जाणार आहे.
अश्विनी भिडे यांना आला राग -गिरगाव मधील नागरिक हा मोर्चा काढणार असल्याने याबाबत मेट्रोची भूमिका काय असणार आहे असा प्रश्न मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मेट्रो ३ च्या प्रमुख अश्विनी भिडे यांना विचारण्यात आला होता. यावर भिडे यांना राग अनावर झाला. आधी त्यांनी तुम्ही बीएमसीमध्ये विचारा असे म्हटले. मेट्रो ३ च्या तुम्ही प्रमुख आहात असे विचारल्यावर तुम्ही मेट्रोच्या पीआरओला हे प्रश्न विचारा असे म्हणत हा कुठला प्रकार आहे. आज महापौर पुरस्कराचा विषय आहे. ते सोडून तुम्ही काहीही प्रश्न विचारणार का असे म्हणत त्या पत्रकार परिषदेमधून निघून गेल्या.