महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग बंद होते, तर कुणाच्या सांगण्यावरून वाढीव वीजबिले? - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर - प्रकाश आंबेडकर यांची राज्य सरकारवर टीका

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी थकित वीज बिलांच्या प्रश्नांवरुन महाआघाडी सरकारवर टीका केली आहे. लॉकडाऊन काळात जर मीटर रीडिंगचे काम बंद होते, तर एप्रिलपासून जे वाढीव वीज बिले दिली आहेत,ही वाढ कुणाच्या सांगण्यावरुन केली? कशी केली ते सरकारने स्पष्ट करावं अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

By

Published : Nov 23, 2020, 4:50 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंगसाठी कंत्राट दिलं होतं. त्यांना बंदी घालण्यात आली नव्हती तर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मीटर रिडिंगच्याबाबतीत आमच्याकडून चूक झाली आहे, हे महावितरणनेच कबूल केले आहे. ५० टक्के वीज बिल माफीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला आहे असंही महावितरणने सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री नेमकं कोण आहेत, उद्धव ठाकरे की अजित पवार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरु नये, असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

बिलामध्ये सवलतीच्या फाईल थेट अजित पवार यांच्याकडे कशी जाते -


काँग्रेसने खुलासा पाहिजे की, थकीत बिलांमध्ये सवलत देणारी फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता ही फाईल थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कशी जाते. आणि अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याशी न बोलता त्यांनी ही फाईल कसे नाकारतात.

लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग बंद होते -


उद्धव ठाकरे यांना आम्ही विचरतोय की, खरा मुख्यमंत्री कोण आहे. वीज थकबाकी ही मार्च 2020 पर्यत 51 हजार कोटींवर पोहचली आहे. जी काही सूट मागीतिली जाते ती घरगुती वापराबाबत आहे. 30 टक्के वाढ ही मार्चमध्ये करण्यात आली. एमएसईबीचे अधिकारी कबूल करत आहेत की, लोकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग काम बंद होते. 50 टक्के बिल माफ करण्याचा प्रस्ताव एम एस ई बीने सरकारकडे पाठवला आहे. 2014 ते 2019 च्या वीज थकबाकीसाठी भाजप जबाबदार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details