मुंबई- कोकण किनारपट्टीवर आलेले चक्रीवादळाचे संकट टळले असले तरी त्यामुळे हवामान विभागाने मुंबईत पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज मुंबईत कुलाबा येथे ४९.६ मिमी तर सांताक्रुझ येथे ४७.० मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूकही वळवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २४ तासात शहर व उपनगरांत आकाश ढगाळ राहून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत सकाळपासून ढग दाटून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत पडलेल्या पावसामुळे मुंबईतील दादर, वडाळा, चेंबूर, वांद्रे, हिंदमाता, चुनाभट्टी, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वरळी, प्रतिक्षा नगर आदी सखल भागात पाणी साचले. सायन, किंग्स सर्कल येथील रस्ता पाण्याखाली गेला होता. पाणी साचल्याने बेस्ट वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टमार्ग वळवण्यात आल्याने त्यांची गैरसोय झाली. दरम्यान पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
झाडे, घरे कोसळली