मुंबई - मुंबईमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन ते चार तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट मुंबई जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Weather Forecast : मुंबईत रेड अलर्ट, येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता - मुंबई रेन न्यूज
मुंबईमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन ते चार तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पाऊस
माहिती देताना शुभांगी भुत्ते
मुंबईत मंगळवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आज रात्रीदेखील मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण किनारपट्टीवरदेखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- पावसासंदर्भातले सर्व ताजे अपडेट्स वाचा खालील लिंकवर -
Mumbai Rain Live : पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; मुंबईत आज रात्रीही मुसळधार पावसाची शक्यता
Last Updated : Jun 9, 2021, 4:32 PM IST