महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Onam festival 2022 ओणम सणाच्या निमित्ताने अम्मा ट्रस्टकडून शांतीचा संदेश - Onam festival In Mumbai

Onam festival 2022 ओणम सणाच्या निमित्ताने अम्मा ट्रस्टकडून शांतीचा संदेश सिएसएमटी स्थानकात भव्यदिव्य फुलांची रांगोळी काढण्यात आली आहे.

Onam festival 2022
Onam festival 2022

By

Published : Sep 10, 2022, 5:49 PM IST

मुंबईमुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ( 26 11 terrorist attack )निष्पाप जीवांचा बळी गेला होता. Onam festival 2022 अनेकजण जायबंदी झाले. Onam festival आज ओणम सणाच्या निमित्ताने अम्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुंबईतील गजबजलेल्या सीएसएमटी स्थानकात भव्य दिव्य फुलांची रांगोळीतून शांतीचा संदेश दिला आहे. तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना रांगोळीतून आदरांजली वाहिली आहे.

अम्मा ट्रस्टकडून शांतीचा संदेश

प्रेमाची आठवण म्हणून साजरा दक्षिण भारतात केरळमध्ये ओणम सण उत्साहात साजरा केला जात आहे. शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात 10 दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. ओणमच्या पहिल्या दिवसाला 'अथम' आणि शेवटच्या दिवसाला 'थिरुओणम' असे म्हटले जाते. Onam festival 2022 ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट- सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.

रांगोळी काढून शांतीचा संदेश गेल्या अनेक वर्षांपासून ओणम सणानिमित्त मुंबईतील विविध रेल्वे स्थानकावर अम्मा असोसिएशन मार्फत समाजप्रबोधन केले जाते. यंदा सीएसएमटी स्थानकात २६/११ मधील दशहतवादी हल्ल्यावर आधारित फुलांची रांगोळी काढून शांतीचा संदेश दिला. Onam festival 2022 रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांची गर्दी होती. अनेकजण रांगोळीचे फोटो मोबाईलमध्ये कैद करत होते. तर काही सेल्फी काढत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत होते.

२६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांना आदरांजली ओणम हा सण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राजा महाबलीच्या स्वागतात ओणम हा सण साजरा केला जातो. महाबली राजाच्या काळात गुन्हे, जाती भेदभाव असे काहीच नव्हते. देशासह महाराष्ट्रात सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतात. त्यामुळे अशी सुस्थिती पुन्हा भारतात निर्माण झाली पाहिजे. हाच मुद्दा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सीएसटीएम स्थानकात झालेल्या २६/११ हल्ल्याबाबत शांतीचा संदेश देणारी रांगोळी रेखाटली असून शहीद झालेल्या लोकांना आदरांजली वाहून ती समर्पित करत असल्याचे अम्मा चॅरिटेबेल ट्रस्टचे अध्यक्ष जोजो थॉमस यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details