मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथक (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांच्या शाळेच्या दाखल्यात त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. तसेच या दाखल्यामध्ये समीर वानखेडे यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखडे आहे. त्यांचा शाळेचा दाखला आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) सादर केला असून, याबाबत आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राद्वारे आपण मुस्लिम असल्याचे लपवल्याचा पुनरुच्चार राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेतून केला.
समीर वानखेडेंनी सादर केलेला दाखला खोटा
सध्या समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जातीचा तसेच जन्माचा दाखला दाखवला जात आहे. तो खोटा असून, 1993 नंतर आपला धर्म लपवण्यासाठी वानखेडे कुटुंबियांकडून खरे दस्तावेज लपवले जात आहे. मात्र त्यांचे सर्व खरे दस्तावेज न्यायालयासमोर ठेवले आहे, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी मलिक यांच्या विरोधात केलेल्या दाव्या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत न्यायालया समोर आम्ही सर्व सत्य समोर आणले, असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.
'समीर वानखेडेंची नोकरी जाणार'