मुंबई -विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Shiv Sena Members membership ) यांच्या शिवसेनेला धक्का दिला होता. मात्र, विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे गटाला धक्का दिला आहे. आज असलेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या कामकाजाच्या बैठकीबाबत विधान परिषद ( maharashtra Legislative Council ) विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे आणि विधानपरिषद ( Working Advisory Committee ) सदस्य म्हणून अनिल परब यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या ( membership of the Working Advisory Committee ) शिवसेनेच्या सदस्यांची संख्या अधिक असल्याने विधान परिषदेवर शिवसेनेचा दबदबा आहे. यामुळेच विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीचे सदस्यत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सदस्यांना सदस्यत्व देण्यात आले आहे.
हेही वाचा -Eyes of Farmers Are Teary कांदा उत्पादक शेतकऱ्यांना का रडवत आहे कांदा?
तर तेथेच विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या सदस्यत्वाला मान्यता मिळाली. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सदस्यत्व म्हणून मान्यता द्यावी, अशा मागणीचे पत्र केले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची ही मागणी धुडकावत एकनाथ शिंदे गटातील दोन मंत्र्यांना सदस्यत्व दिले.