मुंबई - जम्मु कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या भाजपच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अफझल गुरू आणि बुरहान वानी यांना पाठिंबा देऊनही, भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्यासोबत सरकार बनवले होते. (Mehbooba Mufti vs Sanjay Raut) तसेच, आज मुफ्ती जे काही बोलत आहेत त्याला भाजप जबाबदार आहे अशी थेट प्रतिक्रिया देत आमचा पक्षाचा याला कायम विरोध असणार आहे असही शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
अशा गठबंधणाला कायम विरोध - अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti Statement) यांच्यासोबत भाजपने सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या असा घणाघातही राऊत यांनी केला आहे. तसेच, भाजपनेच मेहबुबा मुफ्ती यांना बळ दिले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे. परंतु, आमचा अशा गठबंधणाला कायम विरोध राहीला आहे आणि तो कायम राहील असही राऊत म्हणाले आहेत.
पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयेत - दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. कश्मीरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयेत. याच मेहबुबा मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले आहे असही राऊत म्हलाले आहेत.