मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर २४ ऑक्टोबर २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणारे हाल - मुंबई लोकल
उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर २४ ऑक्टोबर २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील व ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. तर कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येऊन वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत बेलापूर/पनवेल करीता डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तर पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
या मार्गावर लोकल ट्रेन रद्द -
रविवारी ब्लॉक दरम्यान नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपर करीता सुटणा-या डाऊन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरूळ करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर आणि खारकोपर दरम्यान सेवा वेळापत्रकानुसार चालतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील.ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी सांताक्रुज ते गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लाॅकवेळी सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकाच्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर चालविण्यात येईल. तर, अप आणि डाऊनच्या काही फेऱ्या रद्द केल्या जातील.