महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक - railway news

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 7 मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

megablocks-on-all-three-railway-lines-on-sunday-in-mumbai
मुंबई: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

By

Published : Mar 5, 2021, 9:04 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 7 मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार रेल्वे स्थानाकादरम्यान अप डाऊन जलद धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मेगाब्लॉक-

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी 10.55 ते सायंकाळी 3.55 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणार्‍या डाऊन धीम्या मार्गावर लोकल सेवा जलद डाऊन मार्गावर वळविल्या जातील. या लोकल सेवा मस्जिद, स्टॅंडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार स्थानकात थांबणार नाही. तसेच विद्या विहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी 10. 40 पासून दुपारी 3.52 दरम्यान सुटणाऱ्या अपने मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत मस्जिद, स्टॅंडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे लोकल सेवा उपल्ब्ध होणार नाही.

हार्बल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक-

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 11.10 वाजता ते सायंकाळी 4. 10 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या हार्बर मार्गावरील पनवेल/ बेलापूर/ वाशी अप आणि डाऊन मार्गावरील लोक सेवा रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉगदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे. याब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4. 30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहेत.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक-

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी वसई रोड ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 ते रविवारी रात्री 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत काही अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.

हेही वाचा-मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे - गृहमंत्री अनिल देशमुख

ABOUT THE AUTHOR

...view details