महाराष्ट्र

maharashtra

रविवारी मध्य हार्बर मार्गावर राहणार मेगाब्लॉक

By

Published : May 25, 2019, 5:53 PM IST

Updated : May 25, 2019, 11:05 PM IST

रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी मध्य हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक राहणार आहे.

रविवारी मध्य हॉर्बर मार्गावर राहणार मेगाब्लॉक

मुंबई - रविवार दिनांक २६ मे रोजी मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ वाजता ते ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी मध्य हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक राहणार आहे.

रविवारी सकाळी १०.३७ ते सायंकाळी ०३.०६ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सर्व लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावरुन धावतील. तसेच, सर्व स्थानकात थांबे घेतील. परळहुन पुढे या लोकल सीएसएमटीच्या दिशेला जलद मार्गावरुन धावतील. या गाड्या २० मिनिटे उशिराने पोहचतील.

रविवारी सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्ध जलद गाड्या आपल्या नियोजित स्थानका व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्टेशनवर थांबा घेतील आणि २० मिनिटे उशिरा पोहचतील.रविवारी सकाळी ११ सायंकाळी ६ वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या व येणाऱ्या सर्व धीम्या गाड्या १० मिनिटे उशिराने धावतील.

या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे होणार शॉर्ट टर्मिनेशन -
५०१४० रत्नागिरी-दादर गाडी दिवा स्टेशनला थांबवण्यात येईल.
५०१०३ दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकातून सुटेल. या गाडीच्या प्रवाशांसाठी दादर येथून विशेष लोकल चालवण्यात येईल.
ही लोकल दादर स्थानकातून दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. त्यानंतर ठाणे स्थानकात ४ वाजून ६ मिनिटांनी तर दिवा स्थानकात ४ वाजून १३ मिनीटांनी पोहचेल.

या गाड्या राहतील रद्द -
हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ४.१० पर्यंत रद्द राहतील.
सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूर, वाशीला सुटणाऱ्या गाड्या सकाळी १०.०३ वाजता ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत रद्द राहतील.
पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीला रवाना होणाऱ्या गाड्या सकाळी ९.४४ वाजता ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल धावेल तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Last Updated : May 25, 2019, 11:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details