महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Central Railway Megablock : रविवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल - मुंबई रेल्वे मेगाब्लॉक

मध्य रेल्वेचा हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चूनाभट्टी / बांद्रा डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. तर चूनाभट्टी / बांद्रा - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे.

Central Railway Megablock
Central Railway Megablock

By

Published : Jan 20, 2022, 9:04 PM IST

Central Railway Megablock

मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक (Central Railway Megablock) घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक हार्बर मार्गावरील छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - चूनाभट्टी / बांद्रा डाउन हार्बर मार्गावर असणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावरील ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेला कामासाठी १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे.


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेचा हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चूनाभट्टी / बांद्रा डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. तर चूनाभट्टी / बांद्रा - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/ वडाळा रोडवरून वाशी/बेलापुर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी १०. ४८ ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यत बांद्रा/गोरेगांवसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन हार्बर मार्गवरील लोकल सेवा रद्द असणार आहे. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकरिता पनवेल आणि कुर्ला (प्लेटफॉर्म नंबर 8) वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

१४ तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गांवर १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक रविवारी मध्य रात्री १ वाजून २० मिनिटांपासून ते रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यत असणार आहे. परिणामी लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा -Mayor Kishori Pednekar on BJP : हत्तीच्या पिल्लाचे 'चंपा', माकडाच्या पिलाचे नाव 'चिवा' ठेवू - महापौर पेडणेकर

ABOUT THE AUTHOR

...view details