मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वे मार्गावर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कुठल्याही प्रकारचा ब्लॉग घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे डाऊन-अप व डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/ पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन-अप व डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. तसेच सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉग दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सुविधेसाठी या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत.