महाराष्ट्र

maharashtra

Megablock On Central Railway : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

By

Published : May 6, 2022, 7:27 PM IST

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर ( Central Railway Megablock ) रविवारी 8 मे 2022 रोजी मेगाब्लॉक ( Megablock ) घेण्यात येणार आहे.

Megablock On Central Railway
रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 8 मे 2022 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ( Matunga to Mulund up and down expressway ) आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ( CSMT to Bandra up and down Harbor line Megablock ) असणार आहेत. तर सोमवार- मंगळवारी मध्य रात्री पश्चिम रेल्वेच्या वसई ते वैतरणा अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक ( Overnight megablock on Vasai to Vaitarna up down track ) घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक - मध्य रेल्वेमार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. या सर्व सेवा त्यांच्या नियोजित आगमना पेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोचतील. ठाण्याच्या अगोदर या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान त्यांच्या नियोजीत वेळापत्रकानुसार थांबतील आणि आगमनापेक्षा 15 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानांवर पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी ते वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11. 10 ते 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आले आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/ वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते 4.47 वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलकरीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.
पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यत सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रेहून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यत सीएसएमटी करिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.

विशेष लोकल सेवा -मध्य रेल्वेवर हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक - रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर मार्गावर वसई ते वैतरणा स्थानकाच्या अप जलद मार्गावर सोमवारी-मंगळवार मध्य रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक सोमवारी रात्री 11.50 ते मध्य रात्री 2.50 वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय डाऊन जलद मार्गावर मध्य रात्री 1.30 ते पहाटे 4. 30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक 09101 विरार-भरुच मेमु आपल्या निर्धारित वेळेत म्हणजे 4. 35 ऐवजी 4 वाजून 50 मिनिटांनी सुटणार आहे.

हेही वाचा -Mumbai Khairne MIDC Fire : खैरने एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details