मुंबई: मध्य रेल्वे (central railway) रविवार 16 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक (mega block) संचालित करणार आहे. जाणून घ्या हा ब्लॉक कोण-कोणत्या मार्गावर असेल. (central railway mega block).
माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धिमा मार्ग:माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.