मुंबई- मी पवारांना भेटलो ही बातमी मीडियाची आहे. त्यामुळे याआधीही मी विरोधात बसलो होता आणि आताही विरोधातच बसणार असल्याचे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी महेश बागल यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत साधला संवाद हेही वाचा -'बहुजन विकास आघाडी'चे 'महाआघाडी'ला समर्थन देण्याचे संकेत
विकासाचे नाव पुढे करत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सामील झालेले भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपण पवारांच्या संपर्कात केव्हाही नसल्याचे सांगितले आहे. या अगोदरही मी विरोधात होतो आणि यापुढेही विरोधातच बसणार असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
महाराजांच्या भविष्यातली लोकं जर इथे तिथे पळायला लागली तर, महाराष्ट्रातल्या जनतेने विश्वास कसा ठेवायचा, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.