मुंबई - विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र ही निवडणूक घेण्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले होते. मंगळवारी (29 जून रोजी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक पार पडली होती. या बैठकीतही विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तर तिथेच काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या घरी बोलावण्यात आली होती.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आघाडी सरकारच्या बैठका, तर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची तयारी - विधानसभा अध्यक्ष निवडणूक
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र ही निवडणूक घेण्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले होते.
या बैठकीतही विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा झाली होती. साधारणत: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याचा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. मात्र सध्या राज्यातील राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडी सरकारला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून देखील विधानसभा अध्यक्षपदासाठी नेत्यांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे !
दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात 5 जुलैला महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. तर तिथेच सहा तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर तिथेच महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना महाविकास आघाडी सरकारचा बहुमताचा आकडा होता, त्यापेक्षाही अधिक मताने महाविकास आघाडी सरकारचा उमेदवार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकून येईल असा विश्वास अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.