मुंबई - जवळपास अर्ध्याहून अधिक शिवसेना फुटल्यानंतर आता उद्धव ठाकरे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आक्रमक झालेले आहेत. आज ( सोमवारी ) मातोश्रीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. या बैठकीसाठी शिवसेनेने उर्वरित आमदार व राज्यातील काही प्रमुख नेत्यांना देखील मातोश्रीवर बोलवण आहे. या बैठकीला औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे देखील उपस्थित होते. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक आवडतं ठिकाण आहे. जनता ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत आम्ही उद्धव ठाकरे यांना विश्वास दिलाय, की या पुढच्या पुढील काळात देखील औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहील आम्ही सर्व एकनिष्ठ राहू, असा विश्वास देखील आम्ही उद्धव ठाकरेंना दिला असल्याची भावना औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे एक चांगली बैठक झाली. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना अधिक जोमाने संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाढीस येईल. शिवसेनेचे ताकद वाढेल, असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे, असे घोडेले यांनी सांगितले.