मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची गटागटाने बैठक घेत आहेत. त्यात आमदारांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेत आहेत. आज शिवसेनेची मुंबईमधील आमदारांची बैठक होणार होती. मात्र शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लक्षणे आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज होणारी आमदारांची बैठक रद्द करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मुंबईमधील आमदारांची बैठक रद्द - शिवसेना बातमी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागवार शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. आजही शिवसेनेची मुंबईमधील आमदारांची बैठक होणार होती. मात्र शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लक्षणे आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज होणारी आमदारांची बैठक रद्द करण्यात आली आहे.
शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार अशी शक्यता वर्तवली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागवार शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत आमदारांची कोणती कामे बाकी आहेत. कोणते प्रकल्प अर्धवट राहिले आहेत. कोणत्या कामासाठी किती निधी लागणार आहे, याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कोंकण आणि मराठवाड्यातील आमदारांची बैठक घेतली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधील शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबईमधील आमदार आपले प्रश्न आणि समस्या मांडणार होते. मात्र शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लक्षणे आल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. परब हे शिवसेना पक्षाच्या आणि मंत्रीमंडाळाच्या बैठकीला उपस्थित असत. त्यामुळे खबरदारी म्हणून आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. परब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोरोनाबाधित मंत्र्यांची संख्या ८ झाली आहे. यात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि एका अपक्ष मंत्र्यांचा समावशे आहे. आतापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे, उदय सामंत या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.