मुंबई - पैलवान तयार आहे, पण विरोधात कोणी नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस एका जाहीरसभेत म्हणाले होते. मात्र, हेच मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात प्रचाराला का आणतात. तुमची खुर्ची जाणार म्हणून तुम्ही असे बोलत आहात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
ही निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. लोकसभेची निवडणूक झाली त्याचे विषय वेगवेगळे आहेत. शेजारच्या राष्ट्राने अतिरेकी हल्ला केला त्याला देशाने उत्तर दिले ते योग्य आहे. त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाला झाला. पण ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. इथे वेगळे विषय आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. उत्पादन खर्च कमी झाला. 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यवतमाळ येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेलो तर त्या शेतकऱ्यांच्या पत्नीला विचारले तर विहीर खोदली. पाणी नाही लागले कर्ज घेऊन पीक आले नाही. बँकेच कर्ज घेतले अधिकारी आले वसुलीसाठी जप्ती करणार बोलून गेले. तणावाखाली आत्महत्या केली. सरकारने मदत नाही केली.