मुंबई -विधान भवनात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात दाखल झाले होते. महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते. Meeting of Mahavikas Aghadi in Vidhan Bhavan तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आमदार उपस्थित होते. तर शिवसेनेने घटातले विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली असून, जे आपले होते तेच आपले शत्रू झाले. ही परीक्षेची वेळ आहे. जगभरात कोरोना संकट असताना सत्ता होती. संकट गेल्यावर सत्ता गेली. सरकार असतांना आरोग्यसुविधा वाढवल्या. अडिच वर्षातील चांगली कामे जनतेपुढं न्या. आताचे हे खोके सरकार आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आपल्याच लोकांनी दगाफटका केला आता आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. अधिवेशनात उपस्थित राहत नाही, कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेली आल्याची खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. Mahavikas Aghadi Meeting मागच्या अडीच वर्षात अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालले असते. सरकार स्थापन होताना, काँग्रेस एनसीपी दगा फटका करेल असे सांगितले जातं होते. पण आज सांगायला लाज वाटते की, आपल्याच लोकांनी दगाफटका केला. त्यांना खूप सन्मान दिला पण त्यांनी घात केला असल्याची खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
१५ आमदारांनाही ऑफर१५ आमदारांनाही अनेक ऑफर आल्या. पण ते माझ्या सोबत राहिले याचा मला अभिमान आहे. मरण पत्करू पण शरण जाणार नाही.अनेक वर्षे राजकारण केले. पण कधीही वैयक्तिक संबंध कधी बिघडू दिले नाही. असं मत ही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.