महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट - काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीबाबत घोषणा काल केली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे दिग्गज नेते मुंबई उपस्थित आहेत. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार सिल्वर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे.

राष्ट्रपतीपदाची  निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रपतीपदाची निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला

By

Published : Jun 10, 2022, 9:00 AM IST

मुंबई -18 जुलैला होणार्‍या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीबाबत घोषणा काल केली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे दिग्गज नेते मुंबई उपस्थित आहेत. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार सिल्वर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे. सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान ही भेट झाली. राष्ट्रपती निवडणुकीबाबत या भेटीदरम्यान औपचारिक चर्चाही झाल्याची माहिती आहे.

सध्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवर नजर -राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेच्या निवडणुकीवर आणि 20 जूनला होणार्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाची नजर माशाच्या डोळ्यावर होती, त्याच पद्धतीने सध्या आपली नजर केवळ राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवर असल्याचे यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रपती निवडणुकावर लक्ष केंद्रित केले जाईल अशी चर्चा या बैठकीत झाली होती. तसेच शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उद्या काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details