महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 7, 2021, 7:54 PM IST

ETV Bharat / city

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षण हा प्रमुख मुद्दा असणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले होते.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार  बैठक
उद्धव ठाकरे आणि शरद पवार बैठक

मुंबई -राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंद हे बैठकीला उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीत भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षण हा प्रमुख मुद्दा असणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले होते. तसेच राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनीही लक्ष घालावे अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी राज्यपालांना दिले होते. या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे समजते.बैठकीत मराठा आरक्षणावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-शिर्डी साईमंदिर सुरू करा, अन्यथा आंदोलन; ग्रामस्थांचा इशारा

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सकाळी शरद पवारांची घेतली भेट

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन आज सकाळी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच महामंडळाच्या बाबतीत काँग्रेसला अधिकचा वाटा मिळावा या मुद्द्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये महामंडळे, राजकीय परिस्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थिती आणि अनलॉक संदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा-कोरोनाकाळातील कामाबद्दल अंगणवाडी, आशा सेविकांच्या कामाला मुजरा- मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details