मुंबई -कोल्हापुरातील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे एससीएसईएस ( SCSES ) माजी कार्यकारी अध्यक्ष आणि अन्य आरोपींनी ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयातील प्रवेश घोटाळा समोर आला आहे. प्रवेशासाठी ( College admission ) वैद्यकीय इच्छुकांकडून 65 कोटींहून अधिक रक्कम 350 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून गोळा केली होती, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष पीएमएलए ( PMLA ) कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे.
फसवणूक प्रकरणाची चौकशी - ईडीच्या म्हणण्यानुसार एमबीबीएस ( MBBS ) अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सकडून आवश्यक परवानगी नसल्याची माहिती असूनही SCSES ने रक्कम गोळा केली होती. ईडी SCSES द्वारे वैद्यकीय इच्छुकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहे. ज्यामध्ये ट्रस्टचे माजी कार्याध्यक्ष महादेव देशमुख आणि त्यांचे बंधू आप्पासाहेब तत्कालीन सचिव यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना मागील आठवड्यात 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महादेव देशमुख ( Mahadev Deshmukh ) सध्या न्यायालयीन कोठडीत ( Judicial Custody ) आहे.
350 विद्यार्थ्यांची फसवणूक - आरोपपत्रानुसार महादेव देशमुख याने अन्य आरोपींच्या संगनमताने 2011 ते 2016 या कालावधीत सुमारे 350 भोळ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या बहाण्याने सुमारे 65.70 कोटी रुपये उकळले. IMSR, SCSES द्वारे चालवले जात आहे.