मुंबई -मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटकं प्रकरण या दोन्ही प्रकरणात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. अँटिलिया कार स्फोटकं प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. याप्रकरणी सचिन वाझेच्या विरोधात प्रबळ पुरावे असल्याची एनआयए सूत्रांची माहिती आहे. सचिन वाझेच्या विरोधात यूएपीए (UAPA) अॅक्ट देखील लावण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत वाझेवर कडक कारवाई केली जाऊ शकते, त्याचबरोबर वाझेची संपत्तीदेखील जप्त केली जाऊ शकते.
माहिती देताना भाजप नेते किरीट सोमैय्या काय आहे यूएपीए?
यूएपीए कायदा म्हणजे बेकायदेशीर कृतीविरोधी कायदा (Unlawful Activities Prevention Act). सचिन वाझे विरोधात एनआयएनं यूएपीएचे कलम 16 आणि 18 लावले आहे .या कायद्यानुसार जर कोणी दोषी आढळला तर त्याला जन्मठेप किंवा 5 वर्षांचा कारागृह होऊ शकतो. संबंधित व्यक्तीची संपत्तीदेखील जप्त होऊ शकते. यूएपीए कलमानुसार एनआयएकडे खूप शक्ती आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धसका ; शेअर बाजारात ९०० अंशांची पडझड
वाझेची संपत्ती किती?
सचिन वाझे हा पोलीस दलात एपीआय होता. मात्र, वाझेकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या सांगतात की, सचिन वाझेच्या वसुली गॅंगने हजारो कोटी कमवले आहेत. पैसा कुठून आला कुठे गेला याची चौकशी एनआयए, आरबीआय, ईडी, रजिस्ट्रर ऑफ कंपनी, इन्कम टॅक्स अशा विभिन्न संस्थांनी केला पाहिजे. मनी ट्रेन, लाभार्थी कोण आहे, बीट कॉईनचा उपयोग, निनावी ट्रान्जेक्शन, ऑफसोर्स कंपन्या या सगळ्यांचा तपास व्हायला पाहिजे.
सोमैय्या म्हणाले, सचिन वाझेची देशासह विदेशात असलेली संपत्ती जप्त होऊ शकते. मात्र, वाझेकडून कोणाला लाभ मिळाला आहे असे अधिकारी, मंत्री शोधून त्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी किरीट सोमैय्या यांनी केली.
हेही वाचा -विरोधीपक्षनेते हे 'मोठे नेते', म्हणूनच दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही -संजय राऊत
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेला जर बेनामी संपत्ती आढळून आली आणि विविध आर्थिक गुन्ह्याचा तपास करणाऱ्या संस्थांना या संपत्तीचे योग्य विवरण मिळाले नाही, तर वाझेची संपत्ती जप्त होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.