मुंबई -औषधांनाही दाद न देणाऱ्या क्षयरोगांवरील उपचारासाठी एमबीपाल (M-BPal Trial) या पद्धतीने उपचार केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालयातील एका रुग्णास सदर मिश्र औषध पद्धतीनुसार उपचार करण्यास १२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून ही औषधी घेणारा हा पहिला रुग्ण ठरला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
निक्स ट्रायल ९१ टक्के यशस्वी -
औषधांनाही दाद न देणारा क्षयरोग हा दर दोन मिनिटात तीन क्षयरोग्यांचा बळी घेतो, ही वस्तुस्थिती लक्षात घेता, औषध प्रतिरोधी म्हणजेच औषधांनाही न जुमानणारा क्षयरोग (Drug Resistant TB) हा अधिक घातक आहे, याची कल्पना येते. अशा स्थितीत क्षयरुग्णांना दिलासा देवू शकणारी, त्यांना आशेचा किरण दाखवणारी नवीन औषधोपचार पद्धती उपलब्ध झाली आहे. दक्षिण आफ्रिका या देशात निक्स ट्रायल या नावाने ही पद्धती सुमारे ९१ टक्के यशस्वी झाली आहे. यामध्ये अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाच्या पूर्व अवस्थेत असलेल्या (Pre-XDR TB) रुग्णांना बेडाक्विलीन, प्रिटोमॅनिड, लिनेझोलाईड या तीन औषधांची प्रत्येकी एक गोळी एका दिवशी दिली जाते. यापूर्वीच्या उपचार पद्धतीमध्ये निरनिराळ्या ४ ते ५ औषधे मिळून दिवसभरात सुमारे १० ते १२ गोळ्या रुग्णांना देण्यात येत होत्या. तसेच पूर्वीच्या सुमारे १८ ते २४ महिने कालावधीच्या तुलनेत ही नवीन उपचार पद्धती ६ महिन्यांमध्ये गुणकारी सिद्ध होवू शकते. अशी वैद्यकीय तज्ज्ञांना अपेक्षा आहे.
मुंबईत दोन ठिकाणी उपचार -