महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशोत्सव 2020 : कृत्रिम तलावांच्या कामांचा महापौरांनी घेतला आढावा - mayor kishori pednekar

गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जी-दक्षिण विभागामधील कृत्रिम तलाव तयारी कामांचा गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला.

kishori pednekar
गणेशोत्सव 2020: कृत्रिम तलावांच्या कामांचा महापौरांनी घेतला आढावा

By

Published : Aug 14, 2020, 12:32 PM IST

मुंबई - गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जी-दक्षिण विभागामधील कृत्रिम तलाव तयारी कामांचा गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. महापौर कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी सूचना केल्या. तसेच यापूर्वी पारंपरिक पद्धतीने ज्या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्याठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नवीन ठिकाणी मैदानांमध्ये कृत्रिम तलाव तयार करताना मैदान न खोदता तयार करण्यात येणाऱ्या नवीन प्रकारातील कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली. यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता गणेशमूर्तींचे सहजसुलभ विसर्जन कसे होईल, याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश महापौरांनी दिले. जास्तीत जास्त गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. बैठकीला जी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

'कोविड १९' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना आणि आवाहन यापूर्वीच पालिकेनेही केले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आल्‍याचे वृत्त समाजमाध्‍यमांत प्रसारित होत आहे. मात्र यावर अद्याप बंदी नाही. नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेतर्फे बृहन्मुंबई क्षेत्रात १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details