महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सामान्यांचा लोकलप्रवास बंद होण्यासह मुंबईत कडक निर्बंधांचे महापौरांचे संकेत - Mumbai corona patients

अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईत उद्यापासून कडक निर्बंध लावण्यात येतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसात ५ ते ६ हजार रुग्ण दिवसाला आढळून येत आहेत. यात वाढ होऊन दिवसाला १० हजार ते २१ हजार रुग्ण दिवसाला आढळून येतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर

By

Published : Apr 1, 2021, 6:58 PM IST

Updated : Apr 1, 2021, 7:09 PM IST

मुंबई -मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई डेंजर झोनमध्ये आहे. अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईत उद्यापासून कडक निर्बंध लावण्यात येतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मागील लॉकडाऊनप्रमाणे सामान्य प्रवाशांना दिलेली ट्रेन प्रवासाची मुभा रद्द करण्यात येईल, अशीही माहिती माहापौरांनी दिली.

हेही वाचा -लॉकडाऊन लावू नका, काँग्रेस नेते संजय निरुपमांचे हॉटेल व्यावसायिकांसह आंदोलन

मुंबईत सध्या नाइट कर्फ्यू

मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसात ५ ते ६ हजार रुग्ण दिवसाला आढळून येत आहेत. यात वाढ होऊन दिवसाला १० हजार ते २१ हजार रुग्ण दिवसाला आढळून येतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत सध्या नाइट कर्फ्यू लावण्यात आला असला तरी दिवसा गर्दी होत आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचे म्हटले आहे, त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत.

असे असतील कडक निर्बंध

मुंबईत कडक निर्बंध लावले जाणार असून त्यानुसार हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीची कडक अंमलबजावणी केली जाईल. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वयोवृद्ध आणि लहान मुले मोठ्या संख्येने जातात. त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद केली जातील. थिएटर, मॉल बंद केले जातील. ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सामान्य प्रवाशांना ट्रेनमधील प्रवास बंद करून अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. कार्यालयांमध्ये दोन शिफ्ट करण्यावर आणि ५० टक्के उपस्थितीवर भर दिला जाईल. दुकानात जास्त गर्दी होत असेल तर सर्वांना त्रास होऊ शकतो. यामुळे दुकाने एक दिवस सोडून उघडली जातील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने राज्याला फटका -डॉ. संजय ओक

मुंबई डेंजर झोनमध्ये

संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला तर ३१ मार्चला ३ हजार ९०० बेड्स उपलब्ध आहेत. ३२४ आयसीयू तर १७० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या वाढत आहे, त्याप्रमाणे धोकादेखील वाढत आहे. त्यासाठी १६ हजारांहून २५ हजार बेड्स उपलब्ध करून दिले जात आहेत. पालिकेची बेड वाढवण्याची तयारी सुरू आहे. आमची तयारी फुकट गेली तरी चालेल पण नागरिकांनी कोरोनाची लागण होऊ नये, असे त्या म्हणाल्या. मुंबई आजही डेंजर झोनमध्ये आहे. इमारतींमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. झोपडपट्टी आणि चाळीत कोरोनाचा प्रसार कमी असल्याचे त्यांनी संगितले.

Last Updated : Apr 1, 2021, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details