मुंबई- ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर ( Chaityabhoomi ) महापरिनिर्वाण दिनानिमित्त ( Mahaparinirvana Day ) येणाऱ्या अनुयायांसाठी ओमीक्रॉनच्या ( Omicron Variant ) पार्श्वभूमीवर आपण एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती दिली. त्या म्हणाल्या, आपण दरवर्षी चैत्यभूमीवर उत्तम नियोजन करत असतो. दर्शन चैत्यभूमीवर सगळ्यांना मिळेल, त्यासाठी रांगा लागतील, शौचालय व्यवस्था, शेडची व्यवस्था, फुलं, सुरांचं अभिवादन हे सगळं नेहमीप्रमाणे असेल. सगळ्यांनाच दर्शन दिले जाईल. सर्व नियम पाळण्यात येईल, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना दर्शन दिले जाईल राज्यात तसेच मुंबईत कोरोना विषाणूच असलेला प्रसार, जगभरात काही देशात आढळून आलेला ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ऑनलाईन अभिवादन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. याला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसा निर्णय आढावा बैठकीत घेतल्याचे महापौरांनी सांगितले.
बाबासाहेबांना अभिवादन करता येणार -
राज्य सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑनलाईन दर्शन घ्यावे, चैत्यभूमी परिसरात गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यावर इतर सण साजरे केले गेले, कार्यक्रम होत आहेत, मंदिरे उघडण्यात आली आहेत मग महापरिनिर्वाण दिनावरच बंधने का असा प्रश्न आंबेडकरी संघटनांकडून विचारला जात होता. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांनी आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीला येतील असा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयायांची कशा प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल यावर चर्चा झाली त्यानंतर महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार आहे तसेच दूरदर्शनवरून ऑनलाईन दर्शन घेता येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
कोरोना नियमांचे पालन करून अभिवादन - यावेळी बोलताना, मुंबई महापालिका दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चांगले नियोजन करते. यंदाही चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयांसाठी रांगा लागतील त्यांच्यासाठी शौचालय, शेडची व्यवस्था केली जाईल. फुलांनी आणि सुरांनी अभिवादन केले जाईल. येणाऱ्या अनुयायांना पोटभर सुके अन्न दिले जाईल. ही सर्व व्यवस्था ५ डिसेंबरच्या रात्रीपूर्वी पूर्ण केली जाईल अशी माहिती महापौरांनी दिली. कोरोना आणि ओमायक्रॉन या विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेरील अनुयायांना ६ डिसेंबरला दर्शन घेऊ द्यावे. मुंबईमधील अनुयायांनी त्यानंतर दर्शन घ्यावे असे आवाहान महापौरांनी केले आहे. बाबासाहेबांना अभिवादन करताना कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करावे लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
ओमायक्रॉनचे संकट गंभीरतेने घ्यावं लागेल -
जगभरात काही देशात तसेच साऊथ आफ्रिकेत कोरोना रुग्णांची सांख्य वाढली आहे. काही देशात कोरोनाचा ओमायक्रोन हा नवा व्हेरियंट समोर आला आहे. हा विषाणू अधिक घटक आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचे संकट गंभीरतेने घ्यावं लागेल. मुंबईत दररोज चार विमाने येतात. त्यामधून २ हजार प्रवासी दररोज येतात. काही परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी काही लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जात आहे. त्यासाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत अशी माहिती महापौरांनी दिली.