मुंबई- मुंबईमध्ये महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, मागील तीन दिवस रुग्णसंख्या कमी नोंद झाली. रुग्णसंख्या कमी झाली ( Corona Patients Decrease in Mumbai ) हे सर्वांचे श्रेय असून यावरून मुंबईकर नियमांचे पालन करत आहेत ( Mumbiker Follows Rules of Covid ) हे दिसत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली ( Mayor Kishori Pednekar on Corona ) आहे.
पालिका, मुंबईकरांचे यश -मुंबईमध्ये गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली ( Mumbai Corona Patients ) आहे. तीन दिवस रुग्णसंख्या 20 हजारांवर गेली होती. त्यात घसरण होऊन 19 हजार व नंतर 13 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. आजही रुग्णसंख्या कमी असणार आहे. राज्य सरकारने आणि पालिकेने जे निर्बंध लावले आहेत त्याचे पालन मुंबईकर करत ( Mumbiker Follows Rules of Covid ) आहेत. कोणतेही निर्बंध लावताना घाई केली जात नाही. यामुळे निर्बंध लागू करेपर्यंत रुग्णसंख्या वाढली ( Restrictions in Mumbai ) होती. आता निर्बधांचे पालन केले जात असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. हे पालिका प्रशासन आणि मुंबईकरांचे यश आहे, असे महापौर म्हणाल्या.