महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट... महापौर किशोरी पेडणेकरांची घोषणा!

बृहन्मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिवाळीच्या तोंडावर मनपा कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे.

BMC press conference
मुंबई मनपाचे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट... महापौर किशोरी पेडणेकरांची घोषणा!

By

Published : Nov 2, 2020, 3:48 PM IST

Updated : Nov 2, 2020, 9:49 PM IST

मुंंबई - महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान दिले जाते. यावर्षी मुंबईत कोरोनच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लाऊन चांगलं काम केल्याने बोनसची रक्कम वाढवून देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठी घोषणा केली आहे. यंदा पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये बोनस दिला जाणार असल्याची माहिती महापौरांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट... महापौर किशोरी पेडणेकरांची घोषणा!

कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे केले होते. त्याप्रमाणे बोनस देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोनसमध्ये काही प्रमाणात वाढ देण्यात आली आहे. आर्थिक ताण असला, तरीही कोरोना काळातील दिवाळी चांगली जावी, यासाठी बोनस वाढवल्याचे महापौरांनी सांगितले. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री, मनपा आयुक्त आमच्या टीमला जाते, असे त्या म्हणाल्या.

बोनसची मागणी

कोरोना काळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रति वर्षाप्रमाणे यंदा एकूण उत्पन्नाच्या २० टक्के सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी युनियनेचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली होती. याबाबत बने यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र पाठवले होते. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अध्यक्ष असलेल्या म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षीय गटनेते, पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. पत्रात कोरोना काळात पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे. त्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

तारीख पे तारीख

पालिका कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा आणि त्यांचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, यासाठी मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने 23 ऑक्टोबरला पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे. मात्र, या बैठकीत बोनसबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आयुक्तांनी बोनसबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून किती बोनस दिला जाऊ शकतो, याची माहिती दिली जाईल असे सांगितले होते. आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट न झाल्याने 26, 27, 28 ऑक्टोबरला बोनसचा निर्णय घेण्यात आला नाही. 30 ऑक्टोबरला महापौर, पालिका आयुक्त तसेच कामगार संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यात सोमवारी बोनसची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना युनियनचे चर्चेआधीच फलक

पालिका कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती केली जात होती. बोनसबाबत पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली नसताना पालिकेतील कामगार सेनेने 17 हजार रुपये बोनस जाहीर झाल्याचे फलक महापालिकेच्या विविध कार्यालयात लावले होते. यामुळे शिवसेना युनियनच्या फलकबाजीची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

शिक्षण विभाग

अनुदानित शाळा शिक्षक कर्मचारी - 7 हजार 750

प्राथमिक शाळा - 4 हजार 700

अनुदानित खासगी शाळा 2 हजार 350

सिएचव्ही वर्कर 4 हजार 400 रुपये

Last Updated : Nov 2, 2020, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details