महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लसीच्या ग्लोबल टेंडरबाबत मंगळवारपर्यंत स्पष्टता - महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती - ग्लोबल टेंडर

मुंबई महापालिकेने लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुरवठादार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. १० कंपन्यांनी प्रस्ताव पाठवले होते. मात्र त्यापैकी एका कंपनीने माघार घेतल्याने ९ पुरवठादार राहिले आहेत. या ९ पुरवठादारांच्या कागदपत्रांची तसेच लस उत्पादक कंपनीसोबत असणाऱ्या कायदेशीर संबंधांची तपासणी केली जात आहे.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर

By

Published : Jun 3, 2021, 8:12 PM IST

मुंबई - लसीचा तुटवडा असल्याने मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर मागवले आहे. या ग्लोबल टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी ९ पुरवठादारांनी प्रस्ताव दिले आहेत. या पुरवठादारांच्या कागदपत्रांची आणि लस बणवणाऱ्या कंपन्यांसोबत कोणत्या प्रकारचे व्यावसायिक संबंध आहेत याची छाननी केली जात आहे. मंगळवारपर्यंत कोणता पुरवठादार लसीकरण करू शकतो हे स्पष्ट झाल्यावर लसीसाठी कंत्राट दिले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

लसीच्या ग्लोबल टेंडरबाबत मंगळवारपर्यंत स्पष्टता

नक्की यश मिळेल-

मुंबई महापालिकेने लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुरवठादार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. १० कंपन्यांनी प्रस्ताव पाठवले होते. मात्र त्यापैकी एका कंपनीने माघार घेतल्याने ९ पुरवठादार राहिले आहेत. या ९ पुरवठादारांच्या कागदपत्रांची तसेच लस उत्पादक कंपनीसोबत असणाऱ्या कायदेशीर संबंधांची तपासणी केली जात आहे. यासाठी पालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त काम करत आहेत. टेंडरबाबत संपूर्ण माहिती आणि कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. संपूर्ण खात्री पटल्यावर टेंडर दिले जाईल. ग्लोबल टेंडरमध्ये नक्की यशस्वी होऊ असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

दोन वेळा मुदतवाढ-

लस पुरवठ्यासाठीच्या ९ संभाव्य पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी येत्या ३ दिवसात केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. या ९ संभाव्य पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी स्पुटनिक फाईव्ह या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा देखील पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर अन्य एका पुरवठादाराने मान्यता प्राप्त लसींपैकी जी प्राप्त होईल त्या लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार तसेच उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी कोविड लस पुरवठा उपलब्ध करुन घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत. लस पुरवठ्याबाबतच्या या जागतिक निविदांसाठी गेल्या १८ मे आणि २५ मे रोजी मुदतवाढ दिली होती. आता अंतिम मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यात येत आहे.

बारकाईने होणार छाननी -

लस पुरवठा करण्यास इच्छूक असलेले पुरवठादार व प्रत्यक्ष लस उत्पादित करीत असलेल्या कंपन्या या दोघींमधील असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अवश्यक आहे. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होईल, याची खात्री पटेल व किती दिवसात लस साठा पुरवला जाईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सतत पाठपुरावा करीत आहे. सर्व कागदपत्रांची छाननी करुन याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details