महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 19, 2021, 6:11 PM IST

ETV Bharat / city

मुंबईकरांना आणखी त्रास देऊ नका, महापौरांकडून वॉर रूममधील कर्मचाऱ्यांची झाडाझडती

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमला संपर्क करूनही रुग्णांना उत्तरे दिली जात नाहीत, फोन उचलले जात नाहीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी दहिसर येथील पालिका कार्यलयातील वॉर रूमला भेट दिली.

महापौरांची वॉर रूमला भेट
महापौरांची वॉर रूमला भेट

मुंबई -मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमला संपर्क करूनही रुग्णांना उत्तरे दिली जात नाहीत, फोन उचलले जात नाहीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी दहिसर येथील पालिका कार्यलयातील वॉर रूमला भेट देऊन, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. मुंबईकर आधीच त्रस्त असताना त्यांना आणखी त्रास देऊ नका असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

वॉर रूमबाबत तक्रारी

मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारीपासून त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सध्या रोज ८ ते ११ हजारापर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णांना बेड तात्काळ मिळावेत यासाठी प्रत्येक वॉर्डात वॉर रुम तयार करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांसाठी वॉर रुमचे नंबरही पालिकेने जाहिर केले आहेत. त्यामुळे बेड किंवा इतर मदतीसाठी नातेवाईक वॉर रूमशी संपर्क साधतात. मात्र रिंग वाजूनही कोणीही फोन उचलत नाही, रुग्णांना उत्तरे दिली जात नाहीत. अशा अनेक तक्रारी दहिसरच्या आर नॉर्थ विभागातील कोविड वॉर रूमबाबत महापौरांकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापौरांनी वॉर रूमला भेट दिली.

महापौरांची वॉर रूमला भेट

'मुंबईकरांना आणखी त्रास देऊ नका'

प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आज महापौरांनी संबंधित वॉर रूमला फोन केला. चौथ्यांदा फोन केल्यावर त्यांचा फोन उचलण्यात आला. फोन उचलल्यानंतर महापौरांनी त्यांना एका कोरोना रुग्णाचा नंबर दिला. मात्र त्यानंतर वॉर रूमकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे महापौरांनी थेट या वॉर रूमला भेट देऊन, सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तक्रारींबाबत मी स्वतः खातरजमा केल्यानंतर बोलत आहे, मी महापौर असून मला अशी वागणूक मिळत असेल तर, सामान्य लोकांना तुम्ही कशी वागणूक देत असाल याची कल्पना येते. मुंबईकर खूप त्रस्त आहेत. त्यांना अधिक त्रास देऊ नका. त्यांना सर्व सुविधा व्यवस्थितपणे पुरवा असे त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना सुनावले. दरम्यान महापौरांच्या प्रश्नाला उत्तर देताना कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

'सर्व यंत्रणा मुंबईकरांसाठीच'

मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या वेगाने वाढते आहे. रुग्णांना तात्काळ बेड मिळून देण्यासाठी मदत करायला हवी, याच उद्देशाने वॉर रूमची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र त्याचा जर उपयोग होत नसेल, तर वॉर रूमचा काय फायदा? ही सर्व यंत्रणा मुंबईकरांसाठीच उभी केलेली आहे त्याचा फायदा त्यांना मिळाला पाहिजे, अशा शब्दात महापौरांनी संबंधित वॉर रूमधील कर्मचाऱ्यांना समज दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details