मुंबई -बँक घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचा मेव्हणा मयंक मेहता याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने भारताबाहेर हॉंगकॉंगला घरी जाण्याची परवानगी देण्यात आले होते. या विरोधात सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्या. रेवती मोहिते- डेरे यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत म्हटले आहे, की सीबीआय आणि ईडीमध्ये एकवाक्यता नसल्याचे म्हटले आहे. ( Mayank Mehta Case ) या याचिकेवर 25 जून रोजी सुनावणी होणार आहे.
मोदी प्रकऱणात मेहता आरोपी - मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मोदीचा मेहुणा मयांक मेहताला हाँगकाँगमधील त्यांच्या निवासस्थानी परत जाण्याची परवानगी दिली. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. मोदी प्रकऱणात मेहता आरोपी होते. मात्र, त्यांनी मोदींनी केलेल्या फसवणुकीबाबत तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. या मोबदल्यात त्यांना परदेशात आपल्या घरी जाण्यास अनुमती द्यावी, अशी अट घातली होती. ती अट ईडीकडून मान्य करण्यात आली होती. ( Mayank Mehta Case ) त्यांच्यावरील रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली होती.