महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सावधान! ऑनलाइन जोड्या जुळवताय? विवाह संकेतस्थळावर बसला 1 लाख 90 हजारांचा गंडा - matrimonial sites complaints

मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर 'फेक' खातेप्रोफाइल तयार करून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका 42 वर्षीय महिलेला मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांसाठी फसवल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेने अंधेरी पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

सायबर क्राईम
सायबर क्राईम

By

Published : Jun 28, 2021, 11:29 AM IST

मुंबई - लग्न जुळवण्याचा पारंपरिक पद्धतींसोबतच आता ऑनलाइनही जोडीदार शोधला जातो. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन वेबसाइट सुरू झाल्या आहेत. मॅट्रिमोनिअल नावाची वेबसाइटदेखील प्रसिद्ध आहे. अनेक जण हवा तसा जोडीदार मिळावा, यासाठी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर नोंदणी करतात. मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर 'फेक' खातेप्रोफाइल तयार करून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका 42 वर्षीय महिलेला मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांसाठी फसवल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेने अंधेरी पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर पीडित महिला आदित्य गणेश नावाच्या एका व्यक्तींच्या संपर्कात आली. सदर आरोपीने लग्नासाठी उचित स्थळ शोधत असून वास्तव्याला युकेमध्ये असल्याचे सांगितले. दोघांमध्ये संवाद वाढला. यानंतर त्यांनी भेटण्याचे ठरवले. सदर आरोपीने आपण युकेवरून मुंबईला येत असल्याचे पीडित महिलेला कळवले. मात्र, 25 रोजी भारतात आल्यानंतर महिलेला फोन करून आरोपीने कस्टम विभागाने ताब्यात घेतल्याचे सांगितले. प्रमाणापेक्षा अधिक पौंड असल्यामुळे सोडण्यात येत नाही. सुटकेसाठी 1 लाख 90 हजार 750 रुपये भरण्यास गरजेचं असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले.

गुन्हा दाखल -

विदेशी पौंड असल्यामुळे भारतीय चलन उपलब्ध नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. तेव्हा महिलेने आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात 1 लाख 90 हजार 750 रुपये भरले. त्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्क साधला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने अंधेरी पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - ऑनलाइन विवाह संस्थेकडून युवकांना लाखोंचा गंडा

ABOUT THE AUTHOR

...view details