मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) पठण करू, असा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले ( Shivsainik Aggressive Against Navneet Ravi Rana ) आहेत. आज सकाळपासूनच मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. याप्रसंगी नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये इथे घोषणाबाजी करण्यात आली. विशेष करून शिवसैनिकांच्या महिला रणरागिनी मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपस्थित होत्या.
हनुमान चालीसा पठण करण्याचा मुद्दा :सध्या राज्यात हनुमान चालीसा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात आज हनुमान जयंती आहे. त्यानिमित्ताने उत्साहाला उधाण आलं आहे. यामध्ये आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी हनुमान चालीसा पठण केल नाही तर, मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही राणा दाम्पत्यांनी दिला आहे. त्याच कारणासाठी आज मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी गर्दी केली.