महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदी आईच्या भेटीचेही राजकारण करतात, अजित पवारांची टीका..काँग्रेस व भाजपच्या जाहीरनाम्यावर साहित्यिक नाराज..निवडणूक भरारी पथकाकडून ७५ लाखांची रोकड जप्त..

मोदी आईच्या भेटीचेही राजकारण करतात, अजित पवारांची टीका..भाजपच्या जाहीरनाम्यावर साहित्यिक नाराज..निवडणूक भरारी पथकाकडून ७५ लाखांची रोकड जप्त.. यास अन्य राजकीय घडामोडींचा आढावा.

By

Published : Apr 19, 2019, 10:14 AM IST

Updated : Apr 19, 2019, 4:47 PM IST

मतकंदन

मोदी आईच्या भेटीचेही राजकारण करतात..
पुणे - आईच्या भेटीचे ही राजकारण मोदी साहेब करतात, आम्ही ही वेळ असेल तसे आईला जाऊन भेटतो. मात्र, मोदी जे करतात तसे काही करत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत इंदापूर तालुक्यातील सणसर इथे अजित पवार बोलत होते. वाचा सविस्तर..

काँग्रेस व भाजपच्या जाहीरनाम्यवर साहित्यिक नाराज
पुणे - भारतीय जनता जनता पक्ष आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेला स्थान मिळाले नाही. त्यामुळे साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर..

निवडणूक भरारी पथकाकडून ७५ लाखांची रोकड जप्त
मुंबई - निवडणुकीत प्रचारासाठी अनधिकृतपणे वापरण्यात येणाऱ्या पैशांवर निवडणूक आयोग व मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येते. मुंबई शहरात गुरुवारी तीन वेगवेगळया ठिकाणांहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ७५ लाख रुपयांची संशयित रक्कम पकडली आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. वाचा सविस्तर..

साध्वी प्रज्ञासिंहला भाजपकडून तिकीट देणे चुकीचे..
मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह यांचे तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यू संदर्भात केलेले वक्तव्य म्हणजे हुतात्म्यांचा अपमान आहे. अशा उमेदवाराला भाजपकडून तिकीट देणे चुकीचे असल्याचे जमात-ए-उलेमा संघटनेचे गुलजार आजमी म्हणाले. वाचा सविस्तर..

धनगर समाजाला मीच मिळवून देणार आरक्षण..
सांगली - धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे. त्याची सुरवात आम्ही केली आहे. त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ओबीसी कमिशनला याआधी घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असे मतही मंत्री जानकर यांनी व्यक्त केले आहे. आज सांगली आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर..

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींचा शिवसेनेत प्रवेश..
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्या ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी प्रवेश केला. वाचा सविस्तर..

पक्षांतर्गत बंडाळीमुळे गावितांची दमछाक..
नंदुरबार - महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या सत्तरवर्षांपासून मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत नंबर एकचा या जिल्ह्याची ओळख काही केल्या बदलताना दिसत नाही. त्यामुळे या १७ व्या लोकसभा निवडणुकीत येथील मतदारराजा कोणाला कौल देतो . या ठिकाणी कोणाचे पारडे जड राहणार या संदर्भात घेतलेला एक विशेष आढावा. वाचा सविस्तर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात..
जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराला आता खऱ्या अर्थाने जोर चढला आहे. प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उन्मेष पाटील आणि रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. यावेळी अमळनेर, रावेर आणि जळगाव अशा तीन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. वाचा सविस्तर..

लातूरच्या आनंदवाडीत रात्री उशिराही मतदान सुरुच..
लातुर - जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आनंदवाडी गावाला पीक विम्याच्या लाभापासून वगळल्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे दुपारपर्यंत मतदानच झाले नव्हते. वाचा सविस्तर..

जितेंद्र आव्हाडांचे चौकीदार गाणे..
ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक खास गाणे तयार केले आहे. सावन का महिना या गाण्याच्या चालीवर त्यांनी मोदींवर आधारित गाणे गाऊन मोदींना टोला लगावला आहे. एक प्रकारे या गाण्यातून मोदींच्या कामकाजाबाबत आव्हाड निंदा करताना दिसत आहेत. वाचा सविस्तर..

मोदींविरुद्ध कारवाईसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा..
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर शहीद भारतीय सैन्याच्या नावे मते मागितली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोदींवरील कारवाईसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. वाचा सविस्तर..

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींचा पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा..
मुंबई - काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एक धक्का मानला जात आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्या आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. वाचा सविस्तर..

मोदी आणि उद्धव ठाकरे युतीनंतर मुंबईत पहिल्यांदाच एका मंचावर..
मुंबई - देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून दुसऱ्या टप्प्यांनंतर मुबंईत प्रचाराची राळ उडणार आहे. येत्या २६ तारखेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत वांद्रातल्या एमटीएमआरडीए मैदानावर एकाच मंचावर येणार आहेत. वाचा सविस्तर..

सेना, राष्ट्रवादीला मतदान केल्याचे फोटो व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा..
परभणी - आपल्या नेत्याला मतदान करताना त्याचा गुपचूप फोटो काढून तो व्हायरल करण्याचा प्रताप परभणीतील चार तरुणांना महागात पडला आहे. या चारही तरुणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

मुकेश अंबानी यांचा मिलिंद देवरा यांना पाठिंबा..
मुंबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमानांच्या घोटाळ्याबाबत उद्योगपती अनिल अंबानी यांना सातत्याने लक्ष केले असतानाच त्यांचे बंधू उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिल्याने देशभरात खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . देवरा यांना पाठींबा देणारा विडिओ स्वतः देवरा यांनी ट्विट केला आहे . या व्हिडिओत अंबानी यांच्यासह कोटक महिंद्रा ग्रुपचे उदय कोटक यांनीही देवरा यांना पाठिंबा दर्शवला आहे . वाचा सविस्तर..

शरद पवारांचे भाकीत..
रायगड - लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपच्या जागा कमी होणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम करत आहेत. याचा फायदा आघाडीलाच होणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर..

प्रकाश राज यांची स्वाभिमानीच्या प्रचारार्थ शुक्रवारी सांगलीत सभा
सांगली - प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज यांची उद्या (शुक्रवारी) सांगलीमध्ये सभा होणार आहे. मिरजेच्या जवाहर चौक येथे प्रकाश राज यांची तोफ धडाडणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश राज यांची सभा होत आहे. वाचा सविस्तर..

मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नका..
कोल्हापूर - धनंजय महाडिकांनी आमची मैत्री पाहिली. आता दुष्मनी पाहू नका, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते भुदरगड येथील जाहीर सभेत बोलत होते. वाचा सविस्तर..

साध्वी प्रज्ञा यांना भाजपची उमेदवारी कशी?
मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. प्रज्ञासिंह यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मकोका कायद्यांतर्गत शिक्षा भोगली होती. याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळतेच कशी, असे म्हणत सवाल उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर..

आपली जात सांगणारे मोदी उणामध्ये अत्याचार झाल्यानंतर गप्प का..
पुणे -या देशाला हुकूमशाही पाहिजे की लोकशाही पाहिजे हे ठरवणारी निवडणूक आहे. मतदारांना आवाहन करताना राज म्हणाले, मोदी-शाह ही जोडी देशाला रसातळाला नेईल. तेव्हा मतदान करताना तुम्ही सारासार विचार करुन मतदान कराल, असे अवाहनही राज ठाकरेंनी मतदारांना केले. वाचा सविस्तर..

भाजपला मतदान करू नका, पुण्यात मनसेच्या महिला शहराध्यक्षांचा रिक्षातून प्रचार
पुणे - देशभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारही शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप टीका करणे सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी देशभरात अनेक पक्ष एकत्र आले आहेत. पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भाजपविरोधात अनोखा प्रचार सुरू केला आहे. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनासोबत घेऊन त्या स्वतः रिक्षा चालवत गर्दीच्या ठिकाणी पोहोचतात आणि भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करताना दिसतात. वाचा सविस्तर..

Last Updated : Apr 19, 2019, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details