महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसकडून रितेश देशमुखचा जुना व्हिडिओ व्हायरल..ऊसतोड मजूर संघटनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा..अनंत गीतेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार होऊनही कारवाई नाही'.. - round up

काँग्रेसकडून रितेश देशमुखचा जुना व्हिडिओ व्हायरल..ऊसतोड मजूर संघटनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा..अनंत गीतेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार होऊनही कारवाई नाही'..यासह अन्य राजकिय घडामोडींचा आढावा..

मतकंदन

By

Published : Apr 16, 2019, 12:59 PM IST

Updated : Apr 16, 2019, 3:19 PM IST

'56 इंचाचे तर गोदरेजचे कपाट असते'..
लातूर - लोकसभेच्या रणधुमाळीत काँग्रेसकडून एकाही वरिष्ठ नेत्याची सभा लातुरात झाली नाही. प्रचार अंतिम टप्प्यात असताना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील रितेश देशमुख यांचा लातूर सभेतील व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. वाचा सविस्तर..

ऊसतोड मजूर संघटनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा
बीड - लोकसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या गोटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. केज विधानसभा मतदारसंघातील विजय केंद्रे यांच्या पाठोपाठ प्रदिप भांगे यांनी आता राष्ट्रवादीचा हात धरला आहे. प्रदिप भांगे हे महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेचे राज्य सचिव आहेत. भांगेंच्या राष्ट्रवादीत जाण्याने भाजपची बाजू कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे. वाचा सविस्तर..

'गीतेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार होऊनही कारवाई नाही'
रायगड - शिवसेनेचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्‍या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु, तक्रार होऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर..

निवडणूक आयोगाचा गलथान कारभार..
वाशिम - केंद्रीय निवडणूक आयोगाने नवे डिजिटल कार्ड मतदारांच्या हाती सोपविले आहे. मतदान ओळखपत्र पाहिले की डिजिटल युगाचा भास होतो. मात्र, या डिजिटल कार्डवर अनेक चुका आढळून येत आहेत. रिसोड येथील एका वृद्धाला चक्क १९ वर्षीय तरुण दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर..

'शरद पवार देश तोडणाऱ्यांच्या बाजूने..
मुंबई - देश तोडणाऱ्यांच्या बाजूने शरद पवार का उभे आहेत, हा प्रश्न मोदींना आता पडला तसा निकालानंतरही पडावा. देशाचे विभाजन करणाऱ्यांनाच नव्हे तर अशा लोकांशी हातमिळवणी करणाऱ्यांनाही देशाच्या सत्ताकारणात यापुढे थारा मिळू नये. देशद्रोह्यांच्या बाजूने आज जे उभे आहेत ते उद्या राजकीय गरज म्हणून देशभक्तांच्या मांडीला मांडी लावून बसतील तर तो जवानांचा अपमान ठरेल, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. वाचा सविस्तर..

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार'तोफा' आज थंडावणार
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात आज दिग्गज नेत्यांचा सभासंह मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर राहील, असे चित्र आहे. वाचा सविस्तर..

डॉ. भामरेंची इच्छा नसताना उमेदवारी दिली..
धुळे - शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक हे धुळे दौऱ्यावर आले असताना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निवडणुकीबाबत त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. सुभाष भामरे यांनी, "आपली इच्छा नसताना आपल्याला तिकीट दिले गेले आहे, तसेच महापालिका निवडणुकीत झालेला ईव्हीएमचे पाप हे आपले नसून गिरीष महाजन यांचे आहे" असे धक्कादायक विधान केले. डॉ. भामरेंच्या या विधानावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे बघणे महत्वाचे असणार आहे. हा झालेला प्रकार शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला. वाचा सविस्तर..

राज ठाकरेंची आज कोल्हापूरच्या इचलकरंजीत जाहीर सभा
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खा. राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील इचलकरंजी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मनसेकडून लोकसभेसाठी कोणीही रिंगणात नाही. तरीही राज ठाकरे भाजपविरोधी प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. आज सायंकाळी ६ वाजता इचलकरंजी येये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचा सविस्तर..

संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या उर्मट..
रत्नागिरी - मुंबईतल्या राम नवमीच्या कार्यक्रमात 'भाड मे गई न्याय व्यवस्था और भाड मे गई आचारसंहिता' असे म्हणणाऱ्या शिवसेना खासदार सजंय राऊत यांचा समाचार खासदार नारायण राणेंनी घेतला आहे. राऊत यांच्या बोलण्याचा अर्थ हे कायदे पाळत नाहीत, उर्मट झालेत, उन्मत झालेत याचा प्रत्यय आणून देतात अशी टीका राणे यांनी केली. वाचा सविस्तर..

हिंगोलीत १ कोटी रुपयांची रक्कम जप्त..
हिंगोली - चारचाकीमधून नेली जाणारी १ कोटींची रोख रक्कम निवडणूक पथकाने हिंगोलीतील हिवरा पाटी येथे जप्त केली आहे. ही रक्कम नांदेडहून हिंगोलीकडे चारचाकीने ( एम.एच.३८, ८०८२) नेली जात होती. ही रक्कम बँकेची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रक्कम नेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते, ती घेतली गेली नाही. तसेच, वाहनात कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. वाचा सविस्तर..

मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करु..
लातूर - लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. जो तो आश्वासनांची खैरात करीत मताचा जोगवा मागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर अतिशयोक्ती करीत मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करु, मात्र मत हे एनडीए सरकारला देण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. वाचा सविस्तर..

भाजपच्या प्रचार रॅलीसमोर चिमुकल्यांनी दिले...
मुंबई - ईशान्य मुंबईचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांची प्रचार रॅली कांजूरमार्ग पश्चिम येथील म्हाडा वसाहतीत सोमवारी दुपारी काढण्यात आली होती. ही रॅली कांजूरमार्ग पश्चिम म्हाडा वसाहतीत दाखल होताच लहान मुलांनी भिंतीच्या कठड्यावर उभे राहून बहुजन वंचित आघाडीचे नारे दिले. त्यामुळे बहुजन वंचित आघाडी आणि प्रकाश आबेडकर यांच्या आघाडीची दखल घेत रॅली पुढे जात होती. वाचा सविस्तर

..मोदींवर कारवाई कधी ? - भाई जगताप
मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व बसपा नेत्या मायावती यांना दोन दिवस प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली असून त्यावर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईचे काँग्रेसने स्वागत करत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकारे सैनिकांच्या नावाने मते मागत आहेत, त्यांच्यावर आयोग कधी कारवाई करणार असा सवाल काँग्रेसचे नेते व आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर..

सांगलीतील काँग्रेस गेल्या निवडणुकीत संपली..
सांगली - मागील लोकसभा निवडणुकीतच सांगलीमधील काँग्रेस संपली. आता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्हही गायब झाले आहे, असा टोला भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी काँग्रेसला लगावला आहे. तर, एखादी ग्रामपंचायत निवडणूक न लढवणारे राहुल गांधी पंतप्रधानाची निवडणूक लढवत आहेत, अशी खोचक टीका भंडारी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. वाचा सविस्तर..

सैनिकांनी केलेल्या कारवाईचे श्रेय मोदी घेत आहेत - शरद पवार
जालना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मते देऊन आघाडीची सत्ता स्थापन करा, सत्ता येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ असे, आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी परतूर येथे दिले. जालना जिल्ह्यात असलेले परतूर लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. वाचा सविस्तर..

भाजप नेत्याने घेतली मुस्लिम मतदारांची भेट
औरंगाबाद - निवडणूक आली की, अनेक नेते सर्वसामान्यांमध्ये प्रचार करण्यासाठी जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. भाजप नेते शहानवाज हे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारसभेसाठी औरंगाबाद येथे आले होते. येथे ते मुस्लिम मतदारांनाही भेटले. त्यांच्यासोबत फालुद्याचा आस्वादही घेतला. वाचा सविस्तर..

Last Updated : Apr 16, 2019, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details