तुमच्यात हिम्मत असेल तर...
उस्मानाबाद - मराठी माणसाचा कळवळा असल्यास उद्धव ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घ्यावी आणि त्यांना धीर द्यावा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केले.तुम्ही राहुल गांधी यांची मर्दानगी काढण्यापेक्षा किंवा शरद पवारांना काही बोलण्यापेक्षा तुमच्यात जर खरंच हिम्मत असेल, तर तुम्ही दिलीप ढवळे या शेतकर्याच्या कुटुंबाला नक्कीच भेट द्या व तुमची मर्दानगी दाखवा. आम्ही कधीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. वाचा सविस्तर..
नाशिककरांनी गिरीश महाजन यांना पाठवला 'झंडुबाम'...
नाशिक - भाजपच्या अमळनेर येथील बैठकीत पक्षांतर्गत वादावादीत राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली. त्यामुळे नाशिकच्या काही तरुणांनी त्यांना चक्क झंडुबाम आणि मलम पाठविला आहे. तरुणांनी पालकमंत्र्यांना लवकर बरे व्हा, पण नाशिकच्या सेवेत रुजू व्हा, असा उपरोधिक सल्ला दिला आहे. वाचा सविस्तर..
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे जुने कार्यकर्ते प्रचारापासून दूरच..
बीड -केवळ आमची हिंदुत्ववादाची भूमिका आहे म्हणून आम्ही भाजप बरोबर आहोत. अन्यथा आम्हाला बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सन्मानाची वागणूक मिळाली नाही....जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खंत. वाचा सविस्तर..
जितेंद्र आव्हाडांनी कुणाला दिले आव्हान ?...नाशिककरांनी गिरीश महाजन यांना पाठवला 'झंडुबाम'...दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे जुने कार्यकर्ते प्रचारापासून दूरच.. - round up
जितेंद्र आव्हाडांनी कुणाला दिले आव्हान ?...नाशिककरांनी गिरीश महाजन यांना पाठवला 'झंडुबाम'...दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे जुने कार्यकर्ते प्रचारापासून दूरच..यासह अन्य राजकीय घडामोडींचा आढावा.
आपल्याच पक्षाचे चिन्ह विसरले..
सोलापूर -राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या सहवासात राहिलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या जिभेला घड्याळ या शब्दाची सवय झाली. ते आता भाजपवासी झाले तरी घड्याळ त्यांची पाठ सोडत नाही. युतीच्या व्यासपीठावर त्यांनी चक्क घड्याळाला मत देण्याचे आवाहन केले. चूक लक्षात येताच उपस्थितांची माफी मागितली. वाचा सविस्तर..
उत्तरेचे आक्रमण दक्षिणेचे मतदार परतवून लावतील..
अहमदनगर - विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांचा पंतप्रधान मोदींच्या सभेत झालेल्या जाहीर अपमानाचा बदला येथील जनता निश्चित घेणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उत्तरेतून झालेले आक्रमण जनता परतवून लावेल आणि आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना भरघोस मतांनी निवडून देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर..
स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून..
रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुहागर येथील जाहीर सभेत शिवसेनेवर जोरदार शाब्दिक प्रहार केला. शिवसेनेच्या गुहागरमधील सभेत उद्धव ठाकरेंसह एकही नेता विकासावर बोलला नाही. त्यांनी केवळ मला लक्ष्य केले. तुम्ही स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोलता. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हा तुमचा धंदा आता कोकणवासीय पुढच्या काळात सहन करणार नाहीत, अशी टीका तटकरे यांनी शिवसेनेवर केली. वाचा सविस्तर..
उमेदवाराने प्रचारासाठी लढविली नामी शक्कल..
ठाणे - लोकसभेच्या उमेदवारांना आचारसंहितेचे पालन आणि प्रचार अशी तारेवरची कसरत करावी लागते. ठाण्याचे लोकसभेचे सेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाचा प्रचार सुरू आहे. लेझर लाईटचा वापर करून इमारतीवर आयोजक म्हणून त्यांच्या नावाचा प्रचार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. वासा सविस्तर..
अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी खासदार..
रत्नागिरी - अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ गुहागर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. वाचा सविस्तर..
'सातबारा'मतीकर विरुद्ध चौकीदार ही खरी लढाई..
पुणे - खरंतर ही लढाई 'सातबारा'मतीकर विरुद्ध चौकीदार अशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सुपे गावामध्ये आले होते. यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. वाचा सविस्तर..