महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर-माढ्यातील 'टिकटिक' नियमित कळवा..एनडीएचेच २ घटक पक्ष आमने-सामने..आघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस - उमेदवार

सोलापूर-माढ्यातील 'टिकटिक' नियमित कळवा..एनडीएचेच २ घटक पक्ष आमने-सामने..आघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस...या सारख्या राजकीय बातम्यांचा संक्षिप्त आढावा.

मतकंदन

By

Published : Apr 5, 2019, 10:33 AM IST

Updated : Apr 5, 2019, 3:05 PM IST

सोलापूर-माढ्यातील 'टिकटिक' नियमित कळवा, पवारांच्या आदेशाने राष्ट्रवादी लागली कामाला

सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदार संघात चूरशीची लढत होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सोलापुरातील निवडणूक तिरंगी होत आहे. या तिरंगी लढतीत कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकूमार शिंदे यांना कोणताही दगा-फटका होऊ नये, यासाठी खूद्द शरद पवार हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घडामोड आणि हालचाल दररोज कळविण्याच्या सूचना खू्द्द शरद पवारांनी केल्या आहेत. वाचा सविस्तर..

एनडीएचेच दोन घटक पक्ष आमने-सामने, 'या' मतदारसंघात होतेय लक्षवेधी लढत

रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडताना पाहायला मिळत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत सध्या मोदी विरुद्ध राहूल गांधी यांच्यातच खरी टफ फाईट माणली जाते. त्यामुळे एनडीए विरुद्ध आघडी अशी लढत ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र, या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएमधीलच दोन घटक पक्ष आमने सामने आलेत. असा कोणता मतदार संघ आहे, की ज्या ठिकाणी एनडीएचे घटक पक्ष आमने-सामने येवून निवडणूक लढतायत वाचा सविस्तर..

शुक्लकाष्ठ काही संपेना.. आघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. कारण आता आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वाचा सविस्तर..

माढ्यामध्ये संजय शिंदे नावाचे ३ उमेदवार, ४२ जणांनी भरले अर्ज

सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४२ उमेदवारांनी ५२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वाचा सविस्तर..

औरंगाबादेत स्वाभिमानी पक्षाकडून सुभाष पाटील मैदानात; खैरेंची डोकेदुखी वाढली

औरंगाबाद- महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून सुभाष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुभाष पाटील यांनी बैलगाडीवर प्रचार फेरी काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. वाचा सविस्तर..

कॉर्टून नंतर आता व्हिडिओवार, उमेदवार काढत आहेत एकमेकांची लायकी

उस्मानाबाद - लोकसभेचे वातावरण आता चांगलेच तापत आहे. उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ओमराजे आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरील सुरू असलेले युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाचा सविस्तर..

मतदानाची शाई दाखवा ५० टक्के सवलत मिळवा; भांडूपच्या दुकानदाराची जनजागृती

मुंबई- लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. जास्तीत जास्त लोकांनी यावेळी मतदान करावे, यासाठी भांडूपच्या दुकानदाराने अनोखी योजना जाहीर केली आहे. लोकसभेसाठी मतदान करा, हातावरची शाई दाखवा आणि फरसाण व दुकानात मिळणाऱ्या इतर खरेदीत ५० टक्के सवलत मिळवा. अशा योजनेमुळे लोक जास्तीत जास्त मतदान करतील, असा विश्वास दुकानदार कीर्ती शहा यांनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर..

पनवेलमध्ये शेकापला खिंडार! पक्षाचे मोठे नेते भाजपच्या गोटात

पनवेल -ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला पनवेलमध्ये गळती लागली आहे. कामोठे येथील शेकापचे वजनदार नेते के. के. म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले आहे. शेकाप पक्षात मान सन्मान दिला जात नाही म्हणून नाराज झालेल्याने म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर के.के. म्हात्रे यांच्या या पक्षप्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकाप सोबतच राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. वाचा सविस्तर..

बीडमध्ये पुतण्याची काकावर कुरघोडी; आमदार क्षीरसागर विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

बीड - आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीपासून दूर जात सवतासुभा उभारण्याची तयारी केली आहे. शुक्रवारी बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आमदार क्षीरसागर यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमदार क्षीरसागर यांच्या संस्थेवरील कर्मचारी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या गटाने गुरुवारी तक्रार केली. वाचा सविस्तर..

काँग्रेसने सामान्य माणसांची नाही, तर चेल्या-चपाट्यांची गरीबी दूर केली - मुख्यमंत्री

वर्धा - तुमच्या पणजोबांनी सांगितले, आजींनी सांगितले, बाबाने सांगितले, आईने सांगितले अन् आता राहुल गांधीही सांगतात गरिबी हटवू. पण गरीबी हटली नाही, तर वाढली. काँग्रसने सामान्य माणसांची नाही, तर चेल्याचपाट्यांची गरीबी दूर केल्याचा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर वर्ध्यातील केला. वर्षाला 72 हजार रुपये राहुल गांधी गरीबांना देऊ म्हणतात, मात्र पैसे आणणार कुठून असा सवालही त्यांनी यावेळी केला. वाचा सविस्तर..

मिरवणूक काढत उमेदवार आला अर्ज भरायला, कार्यालयाने पाठवले माघारी

नंदुरबार- लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा पहिला अर्ज भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे भरण्यासाठी उमेदवार आले होते. परंतु, अर्ज भरण्याची शासकीय वेळ ३ वाजेपर्यंत असल्याने अर्ज भरणाऱ्यासाठी आलेल्या उमेदवाराला आणि कार्यकर्त्यांना माघारी जावे लागले. वाचा सविस्तर..

भाजपसमोर कोकाटे यांचे मन वळविण्याचे आव्हान
नाशिक - आपल्या मुत्सद्देगिरीमुळे वेगवेगळ्या पक्षातील दिग्गजांना भारतीय जनता पार्टीत दाखल करून घेत पक्षाची ताकद वाढवणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर नाशिकमधील भाजपच्या बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आज भाजपकडूनच उमेदवारी अर्ज सादर केल्याने महाजनांसमोर कोकाटे यांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. वाचा सविस्तर..


किरीट सोमय्यांच्या बोलण्यावरही निर्बंध?
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी किरीट सोमय्याही तेथे उपस्थित होते. मात्र, ते दोनच मिनिटात तेथून निघून गेले. त्यामुळे सोमय्यांचा ईशान्य मुंबई मतदार संघातून पत्ता कट झाल्यानंतर, आता त्यांच्या बोलण्यावरही निर्बंध घालण्यात आले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाचा सविस्तर..

कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार..
ठाणे - महाराष्ट्रातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत कोणत्याही मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याची माहिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी दिली. पुणेकर कल्याणात कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाचा सविस्तर..

तुमचे काम चांगले तर उमेदवार का बदलला?
उस्मानाबाद - काँग्रेसने 70 वर्षात काय केले म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहास तरी माहित आहे का? असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. ७० वर्षाच्या काळात ५ वर्ष अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार होते, त्यावेळी झोपा काढल्या काय असेही पवार यावेळी म्हणाले. तुमचे काम चांगले तर तुम्ही उमेदवार का बदलला असे म्हणत पवारांनी युतीवर टीका केली. वाचा सविस्तर..

शिट्टी वाजली गाडी सुटली म्हणत विनोद तावडेंची विरोधकांवर खोचक टीका
पालघर - शिट्टी वाजली गाडी सुटली म्हणत विनोद तावडेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना तावडे बोलत होते. वाचा सविस्तर..

गरीब असल्यानेच मला मॅनेज उमेदवार म्हणून हिणवले जाते - बजरंग सोनवणे
बीड - शेतकरी कुटुंबातील माझ्यासारखा व्यक्ती लोकसभेच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात निवडणूक लढव असल्यानेच मला मॅनेज उमेदवार म्हणून जाणीवपूर्वक हिणवले जात आहे. सत्ताधार्‍यांकडे याशिवाय दुसरा कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, अशी जोरदार टीका बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते. वाचा सविस्तर..

Last Updated : Apr 5, 2019, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details