महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mini Train Matheran : माथेरानची राणी सुसाट; मध्य रेल्वेने मिनी ट्रेन चालवून दोन कोटी रुपयांची कमाई! - माथेरान मिनी ट्रेन कमाई

पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेनला (Mini Train Matheran) पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेची माथेरान ते अमल लॉज दरम्यान धावणारी मिनी ट्रेनमधून जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत तीन लाख 14 हजार पर्यटकांनी प्रवास केला.

matheran mini train
माथेरान मिनी ट्रेन

By

Published : Feb 28, 2022, 9:49 PM IST

मुंबई - पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेनला (Mini Train Matheran) पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेची माथेरान ते अमल लॉज दरम्यान धावणारी मिनी ट्रेनमधून जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत तीन लाख 14 हजार पर्यटकांनी प्रवास केला असून, यामधून रेल्वेला एक कोटी 89 लाख रुपयांचा महसूल मिळालेला आहे.

3 लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी केला प्रवास-

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने देशभरात मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर केला होता. या दरम्यान माथेरानच्या राणीसह सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. नंतर अनलॉकची सुरुवात होताच माथेरानला पर्यटक येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, वाहतुकीची सोय नसल्यामुळे माथेरान येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे मध्य रेल्वेने 4 नोव्हेंबर 2020 पासून मिनी ट्रेनची सुरुवात केली होती. तेव्हापासून पर्यटकांचासुद्धा तुफान प्रतिसाद मिनी ट्रेनला मिळत आहे. मध्य रेल्वेने अमन लॉज ते माथेरान दरम्यान आठवड्याच्या दिवशी एकूण 16 सेवासह आणि आठवड्याच्या शेवटी 20 सेवासह जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 या बारा महिन्यात 3 लाख 13 हजार 664 पर्यटकांची आणि 44 हजार 779 पार्सल /वस्तू पॅकेजेसची वाहतूक केली आहे. यामधून रेल्वेला एक कोटी 93 लाख रुपयांचा महसूल मिळालेला आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीतून 1 कोटी 89 लाख रुपये आणि पार्सल वाहतुकीतून 3 लाख 59 हजार रुपये महसूल मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिनी ट्रेनसाठी 2022 वर्ष उत्साहवर्धक-

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त महसूल हा नोव्हेंबर 2021 या महिन्यात मिळालेला आहे. नोव्हेंबर 2021 या महिन्यात प्रवासी आणि पार्सल वाहतुकीतून 27 लाख 86 हजार रुपयांचा महसूल मध्य रेल्वेला मिळाला आहे. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये प्रवासी आणि पार्सल वाहतुकीतून 27 लाख 37 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. 2022 वर्षाची सुरुवात जानेवारी 2022 या महिन्यातील 19.26 लाखांच्या उत्साहवर्धक उत्पन्नांसह झाली आहे. यामध्ये 32 हजार 128 पर्यटकांकडून 19 लाख 4 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर पार्सलमधून 21 हजार 582 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details