मुंबई - मुंबईमध्ये २०१७ च्या तुलनेत २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत बालकांचा जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला आहे. त्याच प्रमाणे मृत्यू दरातही घट झाली आहे. प्रसूती दरम्यान होणाऱ्या मातांच्या मृत्यूमध्येही घट झाली आहे. यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SGD) नॅशनल एमएमआर टार्गेटनुसार २०३० पर्यंत मृत्युदराचे टार्गेट गाठणे सहज शक्य असल्याचे प्रजा फाऊंडेशन या एनजीओने मुंबई महापालिका प्रशस्तीपत्र दिले आहे.
जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला -मुंबईमध्ये २०१७ मध्ये १ लाख ५५ हजार ३८८ बालकांचे जन्म झाले. त्यावेळी जन्मदर १२.२० टक्के होता. २०१८ मध्ये १ लाख ५१ हजार १८७ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ११.८३ टक्के जन्मदर होता. २०१९ मध्ये १ लाख ४८ हजर ८९८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी जन्मदर ११.६१ टक्के इतका होता. २०२० मध्ये १ लाख २० हजार १८८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ९.३३ टक्के इतका जन्मदर होता. २०२१ मध्ये १ लाख १३ हजार ७७८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ८.८१ टक्के इतका जन्मदर नोंदवला गेला. २०१७ च्या तुलनेत २०२१ मध्ये जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला आहे.
बालकांचा मृत्यू दर घटतोय-जन्म झाल्यावर २८ दिवसात २०१७ मध्ये २५६३, २०१८ मध्ये २२३९, २०१९ मध्ये २१८६, २०२० मध्ये १८५८ तर २०२१ मध्ये १६७५ बालकांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यावर २८ दिवसात २०१७ मध्ये १६.४९ टक्के, २०१८ मध्ये १४.८१ टक्के, २०१९ मध्ये १४.६८ टक्के, २०२० मध्ये १५.४६ टक्के तर २०२१ मध्ये १४.७२ टक्के मृत्युदर नोंद झाला आहे. जन्म झाल्यावर १ वर्षात २०१७ मध्ये ४०७९, २०१८ मध्ये ३७२३, २०१९ मध्ये ३४३०, २०२० मध्ये २६४९ तर २०२१ मध्ये २६०१ बालकांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यावर १ वर्षात मृत्यू होणाऱ्या बालकांचा २०१७ मध्ये २६.२५ टक्के, २०१८ मध्ये २४.६३ टक्के, २०१९ मध्ये २३.०४ टक्के, २०२० मध्ये २२.०४ टक्के तर २०२१ मध्ये २२.८६ टक्के मृत्युदर नोंद झाला आहे. जन्म झाल्यावर ५ वर्षात २०१७ मध्ये ५०२०, २०१८ मध्ये ४५२९, २०१९ मध्ये ४२२१, २०२० मध्ये ३१२३ तर २०२१ मध्ये ३२८० बालकांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यावर ५ वर्षात मृत्यू होणाऱ्या बालकांचा २०१७ मध्ये ३२.३१ टक्के, २०१८ मध्ये २९.९६ टक्के, २०१९ मध्ये २८.३५ टक्के, २०२० मध्ये २५.९८ टक्के तर २०२१ मध्ये २८.८२ टक्के मृत्युदर नोंद झाला आहे.