मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दीदींना दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असून, अद्यापही त्या आयसीयुमध्येच (ICU) असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी दिली आहे.
- अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन -
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. यावेळी मंगेशकर कुटूंबियांच्यावतीने कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती पसरवू न देण्याचे आवाहन करण्यात आले होते. लता दीदींनी त्यांच्या ट्विटरवरून चाहत्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती.
- लता दीदींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा -
लता दीदींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र त्यांना अजूनही आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन यापूर्वी मंगेशकर कुटूंबियांनी केले होते. डॉ. प्रतीत समदानी हे दीदींवर उपचार करत आहेत.