महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Thackeray On Marathi Bhavan : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन; म्हणाले, नामफलकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन आज पार ( CM Thackeray Inauguration Marathi Bhasha Bhavan ) पडले. यावेळी प्रबोधनकार ठाकरे हे प्रामुख्याने मराठीचे आग्रही होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी भाषा टिकवण्यासाठी आग्रही राहिले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

By

Published : Apr 2, 2022, 6:21 PM IST

marathi bhasha bhavan inauguration
marathi bhasha bhavan inauguration

मुंबई -गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील चर्नी रोड येथील बाल भवन येथे ( CM Thackeray Inauguration Marathi Bhasha Bhavan ) झाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख, मराठी मराठी भाषा राज्य मंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई उपस्थित होते. मराठी भाषा भवन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे प्रामुख्याने मराठीचे आग्रही होते. त्यानंतर वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी भाषा टिकवण्यासाठी आग्रही राहिले. आता मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन होत असून, जी नामफलक बनवण्यात आली आहे. त्यावर माझे नाव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. तसेच, मराठी भाषा टिकून रहावी आणि तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मराठी भाषेत गुदगुल्या असतात -प्रबोधनकारांचे विचार व त्यांची मराठी भाषा आम्ही पुस्तकात वाचली. मराठी भाषा आता आम्ही जवळून अनुभवतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू ते बोलत असताना गुदगुल्या करतात. उद्धवजींची मराठी भाषा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच मोठे अस्त्र आहे. आपण सगळ्यांनी पाहिले आहे. आदित्यची मराठी आम्ही ऐकत आलोय ते शुद्ध मराठी बोलतात. मराठी भाषेचा प्रवास पाहिल्यानंतर कोणी कितीही म्हटलं तरी मराठी भाषा संपणार नाही. महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला येणारी नवीन पिढी आपली मराठी भाषा अभिमानाने पुढे घेऊन जाईल. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो घरी मराठीतच बोलतो. जगाच्या अंतापर्यंत कदाचित त्याच्या नंतर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, कोणत्या माध्यमात, अस्तित्वात राहील, टिकून राहील, असेही अजित पवार म्हणाले.

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, मुंबईमध्ये मराठी भाषा भवन उभे राहावे हे आपल्या महाराष्ट्राला पडलेले स्वप्न आणि आता हे स्वप्न साकार होण्याचा काळ जवळ आला आणि सुरु झालेला आहे. खरे तर असं हे भाषा भवन रंगभवन च्या जागेत बांधायचं ठरवलं होतं. पण कितीतरी अडचणी आल्या, वारसा वास्तू, शांतता क्षेत्र अशा अडचणी आल्या, मग दुसरी जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यामध्ये हा भूखंड आम्हाला प्राप्त झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये खूप स्वारस्य दाखवले. त्यामुळे अतिशय अर्थपूर्ण आणि सर्वांनाच अभिमान वाटेल, असे हे मराठी भाषा भवन असेल. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कुणाचाही मराठीकडे वाकडा डोळा करून पाहण्याची हिंमत होणार नाही, असा वचक निर्माण केला. आणि मराठी चित्रपट, मराठीचा आवाज मुंबईमध्ये घुमू लागला, असेही देसाई म्हणाले.

हेही वाचा -Prabhakar Sail Death Case : प्रभाकर साईलच्या मृत्यूची पोलीस महासंचालकांमार्फत होणार चौकशी.. गृहमंत्र्यांचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details