महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MIFF 2022 Mumbai :...अन् अभिनेत्री सुहिता थत्ते झाल्या भावूक! - सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राशीद इराणी

मुंबईत 17 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सत ( International Film Festival ) सुरू आहे. यात विविध डॉक्युमेंटरी दाखविण्यात येत आहेत. अशीच एक 'इफ मेमरी सर्वेस मी राईट' या नावाची डॉक्युमेंटरी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राशीद इराणी यांच्या आयुष्यावर दाखवण्यात आली. यावर आपली प्रतिक्रिया देताना प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहिता थत्ते ( senior Marathi actress Suhita Thatte ) काहीशा भावुक झाल्या.

MIFF 2022 Mumbai
MIFF 2022 Mumbai

By

Published : Jun 1, 2022, 7:27 PM IST

Updated : Jun 1, 2022, 7:36 PM IST

मुंबई -सध्या मुंबईत 17 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( International Film Festival ) सुरू आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट, शॉर्टफिल्म, डॉक्युमेंटरी दाखविण्यात येत आहेत. अशीच एक 'इफ मेमरी सर्वेस मी राईट' या नावाची डॉक्युमेंटरी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राशीद इराणी यांच्या आयुष्यावर दाखवण्यात आली. यावर आपली प्रतिक्रिया देताना प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहिता थत्ते ( senior Marathi actress Suhita Thatte ) काहीशा भावुक झाल्या.मी आता तीन चित्रपट पाहून आले. या तीनही डॉक्युमेंटरी पूर्णपणे वेगळ्या होत्या. पहिली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली ती एका शेतकऱ्याची हॉलटी कल्चर केलेल्या माणसाची ही कथा मला खूपच भावली, अशी प्रतिक्रिया सुहिता थत्ते यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना सुहिता थत्ते


राशीद समृद्ध जगला :सुहिता पुढे बोलताना म्हणाल्या की, राशीद काहीसा एकाकी आणि तितकाच काहीस उत्तुंग आणि समृद्ध असे आयुष्य जगला. आम्ही अनेक फेस्टिव्हलमध्ये देखील भेटलो होतो. त्याची चित्रपटमगाची आवड, चित्रपटासाठीची जिद्द, जिज्ञासा तितकीच मुंबईबाबत त्याच प्रेम मुंबईची आवड हे सगळे त्याचे अद्भुत असे होते. हे सर्व इतकं कमाल होत की ती फिल्म पाहताना मला भरून आले. इतक छान आयुष्य जगलाय. दरम्यान, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राशीद इराणी यांच्या आयुष्यावर दाखवण्यात आलेली 'इफ मेमरी सर्वेस मी राईट' ही डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माते रफीक यांनी तयार केली आहे.

हेही वाचा -MIFF 2022 : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लहान मुलांसाठी स्पेशल स्क्रीनिंग

Last Updated : Jun 1, 2022, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details