महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलाविली मराठा नेत्यांची बैठक - bjp

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी मराठा नेत्यांची बैठक बोलाविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलाविली मराठा नेत्यांची बैठक
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलाविली मराठा नेत्यांची बैठक

By

Published : Mar 12, 2021, 11:42 AM IST

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मराठा नेत्यांची बैठक बोलाविली आहे. मराठा आरक्षणावरून राज्यभरात तापलेले राजकारण आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीतील चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

15 मार्चच्या सुनावणीच्या अनुषंगाने चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी मराठा नेत्यांची बैठक बोलाविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 15 मार्चला होणाऱ्या मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे? याविषयी मराठा समाजाच्या नेत्यांची काय मते आहेत? हे जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील भूमिकेविषयी या बैठकीत मराठा नेत्यांना माहिती दिली जाईल असे समजते आहे.

इतर राज्यांनाही नोटीस

तामिळनाडू, कर्नाटकसारख्या इतर राज्यांनीही 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. हा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्यामुळे इतर राज्यांनाही नोटीस पाठवावी अशी महत्त्वपूर्ण मागणी गेल्या सुनावणीत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. या मागणीला मान्यता मिळाली असून आता इतर राज्यांचीही मतं आरक्षणाच्या मुद्यावर नोंदविली जाणार आहेत.

सात मार्चला झाली होती सुनावणी

सात मार्चला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणाची सुनावणी झाली होती. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला आरक्षण संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने 7 मार्चच्या सुनावणीत घेतली होती. त्यामुळे या सुनावणीनंतर उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

हेही वाचा -मराठा आरक्षणावर सुनावणी स्थगित; 15 मार्च रोजी होणार पुढील सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details